Exclusive

करबुडव्या कंपनीला मोदी सरकारच्या प्रकल्पाचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट मिळण्याची शक्यता

1 Mins read

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या व कायम संशयास्पद व्यवहार करणाऱ्या कंपनीला ‘यशॊभूमी’चे मोठे कंत्राट मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती लागलेली आहे. त्यामुळे या प्रकल्पाची गुणवत्ता ढासळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे आशियातील सर्वात मोठे प्रदर्शन व अधिवेशन केंद्र उभारण्याचे ठरविले आहे. या केंद्राचे नाव इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर (IICC) ‘यशॊभूमी’ आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले आहे. हा पहिला टप्पा बांधण्यासाठी तब्बल ५४०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे.

सध्या ‘यशॊभूमी’च्या पुढील कामाचे कंत्राट मिळवण्यासाठी ‘Foodlink F&B Holdings’ ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जोरदार लॉबिंग करत आहे, त्यानुसार या कंपनीला मोठे कंत्राट मिळण्याची शक्यता आहे, मात्र या कंपनीचा कारभार हा पारदर्शक नाही. या कंपनीचे व्यवहार अत्यंत संशयास्पद व भ्रष्ट स्वरूपाचे आहेत, अशी खात्रीशीर माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमला (SIT ) मिळालेली आहे. हा प्रकल्प या कथित महाभ्रष्ट कंपनीला मिळाल्यास ‘यशॊभूमी’ या प्रतिष्ठित प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता निर्माण होणार आहे. त्यामुळे केवळ देशहित डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “स्प्राऊट्स’च्या वतीने पत्र पाठविण्यात येणार आहे.

स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला याबाबत सविस्तर माहिती पुराव्यानिशी मिळालेली आहे. त्यानुसार ‘Foodlink F&B Holdings’ ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. कंपनीच्या संचालक मंडळावर संजय मनोहर वझिरानी ( Sanjay Manohar Vazirani) यांच्यासह इतर चार संचालक आहेत. ही कंपनी २८ ऑक्टोबर २०१५ रोजी रजिस्टर करण्यात आलेली आहे.

हाय प्रोफाइल क्लायंट GST च्या रडारवर

मुंबई येथून ही कंपनी चालविण्यात येते. भारत व परदेशातील हाय प्रोफाइल उद्योगपती, बॉलिवूडमधील नट- नट्या व बडे राजकीय नेते यांना विवाह व इतर कार्यक्रमासाठी केटरींग म्हणजेच जेवणासंदर्भातील सुविधा पुरवते. आतापर्यंत या कंपनीने इशा अंबानी व आनंद पिरामल (Isha Ambani and Anand Piramal), आकाश अंबानी व श्लोका मेहता ( Aakash Ambani and Shloka Mehta), रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण (Ranveer Singh and Deepika Padukone) या व इतर अनेक हाय प्रोफाइल लोकांना केटरिंगची सुविधा पुरवलेली आहे.

मोठ्या इव्हेंटमध्ये केटरिंगची सुविधा हाय प्रोफाइल लोकांना पुरवणे, ही या कंपनीची खासियत आहे, असा दावा कंपनीच्यावतीने करण्यात येतो, मात्र प्रत्यक्षात या कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार अत्यंत संशयास्पद आहेत. कर चुकवण्यात तर वझिरानी यांचा हातखंडा आहे. आतापर्यंत त्यांच्या या कंपनीने शेकडो कोटी रुपयांचा कर चुकवला आहे. त्यामुळे सरकारचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.

या करबुडव्या महाभ्रष्ट कंपनीची चौकशी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी- GST ) या सरकारी विभागाच्या गुप्तचर विभागाने सुरु केलेली आहे. इतकेच नव्हे तर या कंपनीचे क्लायंट असणाऱ्या म्हणजेच या कंपनीकडून केटरींगची सेवा घेणाऱ्या या हायप्रोफाईल लोकांना पत्रेही पाठवलेली आहेत, या पत्रांतून त्यांनी या कंपनीच्या सोबत झालेल्या इव्हेंट्सची तपशीलवार माहितीही मागवलेली आहे, अशी विश्वासार्ह माहितीही स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती लागलेली आहे. याबाबत या कंपनीचे संचालक वझिरानी यांना प्रतिक्रियेसाठी वारंवार संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.

Advertorial वर बंदीची मागणी

करबुडव्या संजय वझिरानी याना आतापर्यंत टाइम्स ऑफ इंडिया, फोर्ब्स सारख्या प्रसारमाध्यमांनी गौरविले आहे. ही प्रसारमाध्यमे Advertorial, Award Function च्या गोंडस नावाखाली कोणत्याही फ्रॉड उद्योगपतींकडून पैसे घेतात व त्यांचे ब्रॅण्डिंग करतात. टाइम्स ऑफ इंडियाने गौरविलेले बहुतेक उद्योगपती आज भारताबाहेर पळून गेलेले आहे, तर काही तुरुंगात आहेत. सरकारने Advertorial वर बंदी आणायला हवी. हा प्रकार पेड न्यूजचा प्रकार आहे. कायद्याने तो गुन्हा ठरविण्यात यावा, अशी मागणीही ‘स्प्राऊट्स’च्या टीमच्या वतीने करण्यात येणार आहे.


Related posts
BusinessExclusivePure Politics

HDFC Under Fire in Massive Maharashtra Real Estate Loan Fraud.

4 Mins read
HDFC Faces Heat Over Real Estate Loan Fraud • Systemic Betrayal in Maharashtra Real Estate • 3,000+ Homebuyers Suffer Huge Losses Unmesh…
EntertainmentExclusiveTrending News

NFDC Scandal: Sprouts News Exposes Hiring Irregularities.

3 Mins read
Sprouts News Uncovers NFDC Scandal • Favoritism and Flawed Hiring Revealed • NFDC’s Governance Crisis Deepens Unmesh Gujarathi Sprouts News Exclusive In…
ExclusivePure Politics

PM Housing Scheme Costs Soar Under Eknath Shinde's Tenure.

2 Mins read
PM Housing Scheme Hijacked •PM Housing Scheme Costs Double Under Eknath Shinde Rule • Crores Wasted, Poor Betrayed • No RERA, No…