Education

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार 

1 Mins read

उन्मेष गुजराथी 
स्प्राऊट्स Exclusive 

महाराष्ट्रातील पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात पोते भरून खोटे सोने सापडले आहे, अशी माहिती मंदिर व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. मात्र अधिकाऱ्यांची ही माहिती संशयास्पद आहे. याच्या पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी याआधीही कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार केलेले आहेत. या प्रकरणातही नव्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा महाभ्रष्टाचार केलेला आहे, इतकेच नव्हे तर हा भ्रष्टाचार लपविण्यासाठी त्यांनी भोळ्या भाबड्या वारकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेले आहे, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला मिळालेली आहे. 

श्री क्षेत्र पंढरपूर येथील मंदिरात काही भाविक मुद्दामहून बनावट दागिने टाकत आहेत, अशी चक्क खोटी व वारकऱ्यांची दिशाभूल करणारी माहिती मंदिर प्रशासनाने दिलेली आहे. या प्रकरणातून स्वतःचे हात झटकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वास्तविक मंदिरातीलच कोणीतरी खरे दागिने लंपास केलेले आहेत व त्याजागी खोटे दागिने ठेवून दागिन्यांचा अपहार केलेला आहे, अशी शक्यता आहे.
 
मंदिर प्रशासनाने केलेले गैरव्यवहार: 
*दानपेटीत जमा होणारे पैसे रोजच्या रोज बँकेत जमा न करता दोन-दोन महिने पोत्यात भरून ठेवणे. 

*हिशेबाच्या वह्या आणि पावती पुस्तके यांच्या वापराच्या नोंदी न ठेवणे.

 *प्रतिवर्षी लाखो रुपयांचा खर्च गोधनाच्या खाद्यासाठी करणे; मात्र दुग्धोत्पादनातून मिळणारे उत्पन्न न दाखवणे. 

*मंदिरातील गोधन कसायांना विकणे.   

*48 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च लेखापरीक्षकांकडून तपासून न घेणे. 

*महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची इमारत भाडे करारावर घेणे; मात्र या इमारतीचा अपेक्षित असा वापर न झाल्याने वर्ष 2000 ते 2010 या कालावधीत मंदिराला 47 लाख 97 हजार 716 रुपयांचा तोटा होणे

पंढरपूर येथे विठ्ठलाचे मंदिर सुप्रसिद्ध आहे. या मंदिरामुळे पंढरपूरला ‘दक्षिणेची काशी’ म्हणून मानले गेले आहे. दरवर्षी जवळपास लाखो वारकरी आणि वैष्णवजन  विठोबा माउलीचे दर्शन घेण्यासाठी येथील विठ्ठल मंदिराला भेट देतात. यातील कित्येक वारकरी दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने शेकडो किलोमीटर पायी वारी करतात. या वारकऱ्यांवर मंदिर व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी केलेले आरोप अत्यंत संतापजनक आहेत. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केलेली आहे. 

वारकऱ्यांनी भक्तिभावाने विठ्ठल माऊलींना अर्पण करण्यासाठी आणलेले दागिने प्रशासनाने काउंटरवर जमा करावेत. या दागिन्यांच्या सोने पडताळणीसाठी पूर्ण वेळ valuer नेमण्यात यावा. त्यामुळे सोन्याची पडताळणी त्वरित करणे शक्य होईल. त्यानंतर त्याची रीतसर पावती देण्यात यावी. त्यामुळे भाविकांची फसवणूक टळेल व मंदिरातील भ्रष्टाचाराला आळा बसेल. 

सुनील घनवट,
राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड,
हिंदु जनजागृती समिती

Related posts
Education

मोहनबुवा रामदासी यांनाही सुटला बोगस पीएचडीचा मोह

1 Mins read
उन्मेष गुजराथीस्प्राऊट्स Exclusive ‘जय जय रघुवीर समर्थचा गजर’ करीत समर्थ रामदास स्वामींनी अध्यात्म व बलोपासनेचा संदेश दिला. समर्थांच्या या कार्याचा प्रसार सध्या…
Education

Mohanbuva Ramdasi also escaped the temptation of a bogus PhD

2 Mins read
Unmesh GujarathiSprouts Exclusive Samarth Ramdas Swami gave a message of spirituality and valor while chanting ‘Jai Jai Raghuveer Samarth’. This work of…
Education

निष्क्रिय माजी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या शर्यतीत

1 Mins read
माजी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाची अवमान केल्याबद्दल नोटीस निवड समिती आणि प्रशासकीय अधिकारी आनंद मिलये यांच्याकडे तक्रार दाखल कुलगुरूपदासाठी थेट…