Exclusive

फडणवीसांच्या संमतीनेच मलिकांची अजितदादांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री! 

3 Mins read

फडणवीसांनी विरोधकांची दिशाभूल करण्यासाठीच स्वतःचे पत्र करायला लावले व्हायरल

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने एकच खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मलिक यांना प्रवेश दिल्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. मात्र यामागचे वास्तव वेगळेच असून मलिक यांनी राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात येण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर दस्तुरखुद्द फडणवीस यांच्या संमतीनेच त्यांना सामविष्ठ करून घेण्यात आले आहे. यामुळे देशद्रोही असल्याचा आरोप असलेल्या मलिक यांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही, या फडणवीस यांनी केलेला पत्रप्रपंच हा निव्वळ देखावा असल्याची माहिती ‘स्प्राऊट्स’ हाती आलेली आहे.

मलिक यांच्या नागपूरमधील एन्ट्रीमुळे अधिवेशनाचा पहिल्या दिवशी जोरदार घमासान पाहायला मिळाले होते. नाकाने कांदे सोलणारी महायुती आता देशद्रोही म्हणणाऱ्या मलिक यांना आपल्या मांडीला मांडी लावून कशी काय बसवू शकते. तुमच्या बाजूने बसले म्हणून ते ओके झाले की तुमच्या वॉशिंग मशीनची कमाल आहे? असा सवाल करत विरोधकांनी फडणवीस यांना घेरले होते. परिणामी ही टीका चांगलीच बोचल्याने फडणवीस यांनी तातडीने अजितदादांबा पत्र लिहीत मलिक यांना महायुतीचा भाग करून घेणे योग्य ठरणार नाही, अशी सारवासारव केली. मात्र हा पत्रप्रपंच हा विरोधकांच्या टीकेची धार कमी करण्याचा एक भाग असल्याचे कळते.

या पत्राने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. एकतर फडणवीस यांनी जाहीर पत्र लिहीत महायुतीत खडा टाकण्याची गरज नव्हती. आणि मलिक यांचा सहभाग खटकला होता तर यावर बसून तोडगा काढता आला असता, अशी नाराजी राष्ट्रवादीकडून व्यक्त होत आहे. मात्र पक्षांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलिक यांचा अजितदादा गटातील प्रवेश हा फडणवीस यांच्याच संमतीने झाला होता. त्यांनी याला आधीच आक्षेप घेतला असता तर आम्हाला त्यांना सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसवण्याची वेळच आली नसती. राष्ट्रवादीच्या या दाव्यामुळे फडणवीस यांची पोलखोल झाली आहे.

मलिक हे तुरुंगात असताना त्यांनी आपली मुलगी निलोफर मलिक खान यांच्याकडे पत्र देत राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावाने हे पत्र देण्यात आले होते. या पत्रावर पक्षात विचारविनिमय झाल्यावर मलिक यांना राष्ट्रवादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र देवेंद्र फडणवीस यांना तशी विचारणा करण्यात आली. त्यांनी होकार दिल्यानंतर मलिक यांचा प्रवेश निश्चित झाला. विशेष म्हणजे त्यानंतर मलिक यांचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग सुकर झाल्याचे समजते.

आजारीपणामुळे त्यांचा जामीन मंजूर झाला आणि याला ईडीकडून सुद्धा फारसा विरोध झाला नाही, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला मिळालेली आहे.

मलिक यांचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप करत फडणवीस यांनी मोठे रान उठवले होते. यानंतर ईडीच्या जाळ्यात अडकलेल्या मलिक यांना जामीन मिळणे सुद्धा अशक्य झाले होते. आधीच आजारी असलेल्या मालिक यांची तुरुंगात प्रकृती ढासळत गेल्याने त्यांचे कुटुंब चिंतेत होते. मात्र, अचानक मलिक यांनी राष्ट्रवादीकडे पाठवलेल्या पत्राने सूत्रे वेगाने फिरली. पण, मलिक अधिवेशनात थेट सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने फडणवीस यांची पंचाईत झाली. या साऱ्या प्रकारामुळे जनमानसात आपली आणि भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचे लक्षात येताच अजितदादांना पत्र लिहून त्यांनी तो मी नव्हेच, अशी भूमिका घेतली आहे.

भाजपला प्रफुल्ल पटेल का चालतात?
मुंबई बॉम्ब खटल्यातील आरोपी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या इकबाल मिरचीकडून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मालमत्ता घेतल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. ईडीचा ससेमिरा पटेल यांच्या मागे लागला होता. असे असतानाही प्रफुल पटेल भाजपला प्रिय आहेत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. पटेल यांच्यामुळे महायुतीत बाधा येत नाही, मग मलिक यांच्यामुळे कशी काय येते, याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले आहे.

Malik’s entry into Ajit Pawar’s NCP with the consent of Devendra Fadnavis!

Fadnavis’s letter is just to mislead the Opposition

Unmesh Gujarathi
Sprouts Exclusive

On the occasion of the winter session, MLA Nawab Malik has been sitting on the bench of the ruling party. Deputy Chief Minister Devendra Fadnavis has written a letter to Deputy Chief Minister Ajit Pawar expressing his displeasure over the entry of Malik into the NCP. But the reality behind this is different and after Malik expressed his desire to join the Ajit Pawar group of NCP, he was included only with the consent of Fadnavis himself. Due to this, it will not be appropriate to take Malik, who is accused of being a traitor, in the Mahayuti (grand alliance), it has come to light that the letter made by Fadnavis is a mere show.

Due to Malik’s entry in Nagpur, the first day of the convention witnessed a lot of excitement. How can a ‘self-claimed’ party with different allies once called traitors? How can the pedantic and self-claimed party with difference BJP, allies once called traitors? Is it ok as it sits on your side or is your washing machine maxed out? Fadnavis was surrounded by the opposition asking this question. As a result of this criticism, Fadnavis immediately wrote a letter to Ajit Pawar and concluded that it would not be right to make Malik a part of the Mahayuti. But this letter appears to be a part of softening the edge of the opposition’s criticism.

This letter has given Ajit Pawar’s NCP a big shock. There was no need for Fadnavis to throw stones at the Mahayuti (grand alliance) by writing a public letter either. And if Malik’s participation had been compromised, a solution could have been found sitting on it, the NCP is expressing displeasure. But according to party sources, Malik’s entry into the Ajit Pawar group was with the consent of Fadnavis. If they had objected to it earlier, we would not have had time to put them on the bench of the rulers. Due to this claim of NCP, Fadnavis has fallen into disrepute.

While Malik was in jail, he wrote a letter to his daughter Nilofar Malik Khan expressing his desire to join the Ajitdada faction of the Nationalist Congress Party. This letter was given in the name of Sunil Tatkare, the regional president of this group. After discussion in the party on this letter, it was decided to include Malik in NCP. But Devendra Fadnavis was asked the same. After he agreed, Malik’s entry was confirmed. Interestingly, after that Malik’s way out of jail is understood to be easier.

The Sprouts’ Special Investigation Team has received information that his bail was granted due to illness and there was little opposition from the ED.

Fadnavis had raised a furore by alleging that Malik had financial dealings with notorious gangster Dawood Ibrahim. After this, it was impossible for Malik, who was caught in the ED’s net, to get bail. Malik’s family, who was already ill, was worried as his condition deteriorated in prison. However, suddenly with the letter sent by Malik to the NCP, the sources moved fast. But Fadnavis became the panchayat as Malik directly sat on the ruling bench in the session. Realizing that his and BJP’s image is tarnished in the public mind due to all this, he has written a letter to Ajit Dada and has taken the stand that it is not me.

Why does Praful Patel work for the BJP?
The BJP leaders had alleged that senior NCP leader Praful Patel had taken property from Iqbal Chili, the accomplice of the Mumbai bomb case accused Dawood Ibrahim. ED’s Sasemira Patel was followed. Despite this, is Praful Patel dear to the BJP? Such a question is being raised on this occasion. Sources have also pointed out that because of Patel, there is no obstacle in the Grand Alliance, so what happens because of Malik?

 

Related posts
Exclusive

Complaints Pour in Against ‘Marathon’ Over Builder’s High-Handedness

2 Mins read
• MahaRERA Managing Director’s Role Under Scrutiny • Forced Signatures on Consent Letters Add Fuel to the Fire Unmesh Gujarathi Sprouts Exclusive…
Exclusive

Multi-Crore Scam by MahaRail's Corrupt MD Rajesh Kumar Jaiswal

3 Mins read
Multi-Crore Scam by MahaRail’s MD Scammer MD Who Took an Illegal Extension of Service Unmesh Gujarathi Sprouts News Exclusive It seems like…
BusinessExclusive

Fraudulent Networks Exploiting One-Time Settlement (OTS) Schemes to Defraud Companies.

3 Mins read
Unmasking Fraudulent Networks Exploiting OTS Schemes in Mumbai and Delhi UnmeshGujarathi | Sprouts Exclusive Promoters of financially distressed companies in Mumbai and…