Exclusive

‘मुंबै बँके’तील भाजपच्या नेत्याच्या भावाची नियुक्ती नियमबाह्यच  

1 Mins read

सत्तेचा गैरवापर करून ‘मजूर’ मतदारसंघात घोटाळा 

उन्मेष गुजराथी 

स्प्राऊट्स Exclusive 

मुंबै बँकेचे वादग्रस्त चेअरमन प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या भावाला बिनविरोध निवडून आणण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारचा पुरेपूर गैरवापर केला, त्यासाठी त्यांनी निवडणूक निर्णय प्राधिकरणालाच मॅनेज केले, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या इन्व्हेस्टीगेशन टीमला मिळालेली आहे.  

मुंबै बँकेच्या संचालक पदासाठी ‘मजूर’ हा मतदारसंघ आहे. या पदासाठी सदस्याने मजूर म्हणजेच अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणे आवश्यक आहे, इतकेच नव्हे तर त्याचे उपजीविकेचे साधन हे मजूरीवर अवलंबून असणे बंधनकारक आहे. मात्र प्रवीण यशवंत दरेकर यांनी चक्क २० वर्षे ‘मजूर’ या मतदारसंघातून निवडणूक लढवली व कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केली. मुंबै बँकेच्या हजारो ठेवीदारांचा केलेला हा विश्वासघात आहे. 

२० वर्षांच्या या फसवणुकीनंतर अखेर ३ जानेवारी २०२२ रोजी सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी गैरप्रकरणाला वेसण घालण्याचे ठरवले.  त्यानुसार सर्वप्रथम त्यांनी प्रवीण दरेकर यांना ‘मजूर’ म्हणून ‘अपात्र’ घोषित केले. मात्र हा अपात्रता काही काळापुरतीच यशस्वी झाली, त्यानंतर मात्र जुलै २०२२ च्या अखेरीस शिंदे- फडणवीस यांच्या युतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले व फडणवीस यांच्या आशीर्वादाने प्रवीण दरेकर पुन्हा मुंबै बँकेचे चेअरमन झाले. 

प्रवीण दरेकर हे पहिल्यापासूनच पदाचा दुरुपयोग करण्यात ‘प्रवीण’ मानले जातात. त्यांची पुनर्नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांचे बंधू प्रकाश दरेकर यांची ‘मजूर’ मतदारसंघातून बिनविरोध निवड केली. त्यासाठी त्यांनी सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केल्याचे ‘स्प्राऊट्स’च्या टीमला आढळून आले आहे. 

मुंबै बँकेच्या ‘मजूर सहकारी संस्थे’च्या निवडणुकीसाठी एक जागा रिक्त होती. या पदावर प्रकाश यांची नियुक्ती करण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी पुणे येथील निवडणूक निर्णय प्राधिकरण ‘मॅनेज’ केले. यासाठी त्यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर दबाव टाकला व निवडणुकीच्या नियमांचे उल्लंघन केले. 

दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था व निवडणूक निर्णय अधिकारी तसेच ‘मुंबै बँक’ यांना निवडणुकीचे परिपत्रक काढण्यात आले. हे परिपत्रक दुसऱ्याच दिवशी म्हणजे ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पुढारी वृत्तपत्रकात प्रसिद्ध करण्यात आले. या परिपत्रकात निवडणुकीचा स्पष्ट उल्लेख नव्हता. इतकेच नव्हे तर त्यांनी दिलेल्या निवडणुकीच्या वेबसाईटची लिंक ओपन होत नव्हती. 
या परिपत्रकानुसार ६ व ७ 

ऑक्टोबर २०२२ या दोन दिवसात नामनिर्देशन पत्रे मिळण्याची व दाखल करण्याची तारीख, वेळ व स्थळ देण्यात आलेले होते. तसेच ८ व ९ ऑक्टोबर २०२२ हे दिवस शनिवार व रविवार असल्याने प्राधिकरण व बँकेच्या कार्यालयाला सुट्टी होती. तसेच नामनिर्देशन पत्राच्या छाननीसाठी तारीख १० ऑक्टोबर २०२२ देण्यात आलेली होती. 

ही निवडणूक प्रक्रिया निवडणुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे. यातून प्रवीण यांनी त्यांचे  भाऊ प्रकाश याला बिनविरोध निवडून आणण्यासाठी केलेले कारस्थान स्पष्ट दिसून येते. त्यामुळे प्रकाश दरेकर यांची झालेली बिनविरोध निवड ही बेकायदेशीर ठरल्याचे स्पष्ट होते.  

प्रवीण यांच्याप्रमाणे प्रकाश दरेकरही ‘मजूर’ म्हणून अपात्रच 

प्रवीण दरेकर यांना मुंबईच्या विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेने ‘मजूर’ म्हणून ‘अपात्र’ ठरवलेले होते. मात्र त्याच वेळी त्यांचे बंधू प्रकाश दरेकर हे मात्र ‘मजूर’ म्हणून पात्र कसे ठरतात, हा साधा प्रश्न आहे. 

वास्तविक दोन्ही भाऊ हे व्यवसायाने उद्योजक आहेत, ते दोघे आयकर भरतात इतकेच नव्हे तर अंगमेहनतीची कोणतेही कामे करीत नाहीत. त्यामुळे प्रवीण यांच्याप्रमाणे प्रकाशही ‘मजूर’ या मतदारसंघात अपात्र ठरतात.   

दरेकरांना फडणवीसांचा ‘आशीर्वाद’ 

विधानपरिषदेचे सदस्य व माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे मागील २० वर्षांपासून संचालक पदावर निवडून येत होते. या २० वर्षांच्या काळात त्यांनी असंख्य घोटाळे केले. कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केली. मात्र २०१४ नंतर इडीची कारवाई होवू नये, म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. व पुनश्च घोटाळे करायला सुरुवात केली. 


Related posts
Exclusive

Remembering Pritish Nandy: A Multifaceted Luminary

2 Mins read
Pradeep Chandra Sprouts News Today, we remember the extraordinary life and legacy of Pritish Nandy, who would have turned 74. Tragically, he…
BusinessExclusive

Over 15k Investors Defrauded of ₹500 Crore: Key Accused Absconding.

2 Mins read
Over 15,000 Investors Defrauded of ₹500 Crore Key Accused Absconding for 8 Months Unmesh Gujarathi Sprouts Exclusive A massive investment fraud involving…
Exclusive

Complaints Pour in Against ‘Marathon’ Over Builder’s High-Handedness

2 Mins read
• MahaRERA Managing Director’s Role Under Scrutiny • Forced Signatures on Consent Letters Add Fuel to the Fire Unmesh Gujarathi Sprouts Exclusive…