Site icon Sprouts News

बेकायदेशीरपणे औषधे बनवून गोळा केली कोट्यवधींची माया 

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स IMPACT

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सध्या बेकायदेशीरपणे औषधे तयार करण्यात येतात व त्यांची संपूर्ण भारतात अवैधपणे विक्री करण्यात येते. यामुळे लाखो रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. याविषयीचा स्पेशल रिपोर्ट ‘स्प्राऊट्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. याची दखल महाराष्ट्र्र राज्याच्या अन्न व प्रशासन विभागाने घेतली व तात्काळ नोटीस देवून उत्पादन थांबवले. मात्र अदयाप त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पुण्यामध्ये पवनकुमार जगदीशचंद गोयल यांनी Ace Remidies नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी स्थापन केली. सुरुवातीला या कंपनीला काही मेडिकल कंपन्यांच्या औषधांची केवळ विक्री करण्याचे लायसन्स मिळाले होते. मात्र झटपट पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी गोयल यांनी थेट बेकायदेशीरपणे औषधांची निर्मिती व त्यानंतर त्यांची अवैधपणे विक्री करण्याचा सपाटाच लावला. यातून त्यांनी कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केली.

‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती काही पुरावे लागले व यातूनच २३ मार्च २०२२ व १६ जून २०२२ रोजी याविषयीचे स्पेशल रिपोर्ट्स ‘स्प्राऊट्मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. या रिपोर्ट्सने पुणेकरांची तर अक्षरश: झोपच उडाली. अन्न व प्रशासन विभागानेही तातडीने पाऊले उचलली.

Ace Remedies या कंपनीला ताबडतोब उत्पादन थांबविण्याची नोटीस देण्यात आली. त्यानुसार कंपनीने बनावट औषधे बनविण्याचे व त्याची विक्री करण्याचे तात्काळ थांबवले. प्रशासनाने या कंपनीतून काही औषधांचे सॅम्पल्स ताब्यात घेतले आहेत व त्यातील काहि सॅम्पल्स अप्रमाणित असल्याचे ‘स्प्राऊट्स’ला लेखी दिलेल्या उत्तरातून सांगितले. याविषयी प्रशासन अधिक तपास करीत आहे.


Exit mobile version