Sextortionist Father (priest) again scot-free
A conspiracy to privatise Ordnance factories
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात हडपसर नावाचे गाव आहे. या गावातील १३ वर्षीय शालेय मुलावर फादर विन्सेंट परेरा ( ५६ ) याने वारंवार अनैसर्गिक लैंगिक कृत्य केले, असा आरोप ठेवून त्याला पॉस्को कायदा लावण्यात आला. त्यानंतर तो जवळपास २२ दिवस फरार होता. त्यानंतर तो थेट पुणे जिल्हा सेशन न्यायालयात दाखल झाला.
या प्रकरणात एफआयआर नोंदविण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. एकंदरीतच हडपसर पोलीस स्थानकातील इन्व्हेस्टीगेशन ऑफिसर सुशील डमरे व पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांनी एफआयआर नोंदविण्यास टाळाटाळ केली. अखेरीस तब्बल ११ महिन्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने नोटीस पाठवली व त्यानंतर नाईलाजाने पोलिसांनी एफआयआर घेतला, मात्र त्यातही त्यांनी केस वीक होईल, याची पुरेपूर काळजी घेतली. याच आधारे कोर्टाची दिशाभूल करण्यात फादर विन्सेंट परेरा (Vincent Pereira) यशस्वी झाला व त्याला जामीन मिळाला.
या प्रकरणात मुख्य आरोपी फादर विन्सेंट परेरा (Vincent Pereira) याने हडपसर येथील पोलीस स्थानकातील इन्व्हेस्टीगेशन ऑफिसर सुशील डमरे यांनी जाणीवपूर्वक केस वीक केली. आरोपी क्रमांक १ व २ यांना वाचविण्यासाठी डमरे यांनी या कायद्यातील १६ व २१ हे कलम पोलिसांनी लावलेच नाही. त्याऐवजी फक्त ८ कलम लावले, जे फक्त परेरा यालाच लागू आहे. एकंदरीतच परेरा याला जमीन मिळेल व इतर २ आरोपींची सुटका होईल, याची तजवीज डमरे यांनी अगोदरच करून ठेवली होती.
वास्तविक परेरा हा विकृत व लिंगपिसाट असल्याची माहिती मिळत आहे. हडपसर येथील हे प्रकरण होण्याअगोदर हा दुसऱ्या प्रकरणात आरोपी आहे, अशी माहिती स्प्राऊट्सला मिळालेली आहे. पुण्यातील St Patrick’s High School या शाळेत परेरा हा मुख्याध्यापक होता. तेथेही तो अशाच प्रकारे कोवळ्या मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करीत असे. यातील एका प्रकरणात परेरा याने तीन मुलांचे संपूर्ण कपडे काढले व त्यांना अश्लील व्हिडीओ दाखवले व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पालकांनी त्याला जाब विचारला असता, परेरा यानेच पालकांना धमकावले. अखेरीस २०१८ मध्ये परेरा यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात तो जवळपास दीड वर्षे पुणे येथील येरवडा येथील तुरुंगात होता. त्यादरम्यान पुणे जिल्हा सेशन न्यायालयाने त्याला २ वेळेला जमीन नाकारला. अखेरीस त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, तेथे मात्र त्याला जामीन मंजूर झाला. यानंतर बिशप थॉमस डाबरे ( Thomas Dabre ) यांनी परेरा याला पुणे येथील नवसाधना ध्यान केंद्रात ( Nav Sadhana Diocesan Pastoral Centre ) रहायला जागा दिली. या केंद्रात नेहमी येणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पालकांशी त्याने घट्ट मैत्री केली व त्यांच्या हडपसर येथील घरी जावून त्यांच्याच १३ वर्षीय मुलाबरोबर अनैसर्गिक अश्लील कृत्य वारंवार केले.
त्यानंतर तो पुणे जिल्याच्या खडकी विभागातील सेंट जोसेफ बॉयज स्कूल ( St. Joseph’s High School – Khadki ) येथे मुख्याध्यापक म्हणून काम बघू लागला, तेथेही त्याने ४ मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. मात्र ते प्रकरण नंतर दाबण्यात आले.
परेरा नावाचा हा लिंगपिसाट काही वर्ष सोलापूर येथील एका नामांकित कॉन्व्हेंट शाळेत पुन्हा मुख्याध्यापक पदावर रुजू झाला. तेथेही त्याने अशा प्रकारे हैदोस घातला. यातील एका प्रकरणात तेथील सुरक्षारक्षकावरच त्याने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. या सुरक्षारक्षकाची दोन मुले याच शाळेत होती. त्यांना नापास करु नये, अशी भीती घालून परेरा याने त्याच्यावर हे अत्याचार केले.
परेरा याच्या या दुष्कृत्यांची मालिकाच स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने वाचकांसमोर उघडकीस आणलेली आहे. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे वारंवार तक्रारी, एफआयआर होऊनही परेरा आजही मोकाट फिरत आहे.