Exclusive

व्हिसा सबमिशनमध्ये त्रुटी ठेवून टुरिस्ट कंपन्यांचा ग्राहकांना गंडा

1 Mins read

उन्मेष गुजराथी 

स्प्राऊट्स Exclusive 

परदेशी टूरवर जाताना व्हिसा असणे बंधनकारक असते. हा व्हिसा काढताना सर्वप्रथम सबमिशन करावे लागते. हे सबमिशन करताना काही ट्रॅव्हल्स कंपन्या जाणीवपूर्वक यामध्ये त्रुटी ठेवून देतात. आणि त्यामुळे टुरिस्टला टूरला जात येत नाही. आणि याच सबबीखाली त्याला एक दमडीही परत दिली जात नाहीत, अशी असंख्य प्रकरणे सध्या मुंबईत घडत आहेत. त्यामुळे या कंपन्या अक्षरश: कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा करीत आहेत, अशी धक्कादायक माहिती “स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला मिळालेली आहे.  

नीम हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड (Neem Holidays Private Limited ) ही ट्रॅव्हल कंपनी आहे. मनीष रामगोपाल अग्रवाल Manish Ramgopal Agarwal व अलका मनीष अग्रवाल Alka Manish agarwal हे दोघे या कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीने युरोप टूर (Europe Tour) आयोजित केलेली होती. त्यासाठी मुंबईतील उद्योजक दीनदयाळ मुरारका ( Deendayal Murarka ) यांनी २० जून रोजी ४,९०,००० रुपये दिले होते. या पॅकेजमध्ये मुरारका यांची मुलगी, जावई व दोन नातवंडे यांचा समावेश होता. यातील ४ लाख रुपये हा चार व्यक्तींचा टूरचा खर्च होता. तर या चार जणांचा व्हिसा काढण्यासाठी कंपनीने ९० हजार रुपये घेतले होते. व्हिसा काढण्याची जबाबदारी ही कंपनीची होती. 

व्हिसा काढताना सबमिशन करावे लागते, या सबमिशनमध्ये जाणीवपूर्वक काही त्रुटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अगोदरच करून ठेवलेल्या होत्या. त्यामुळे जावई व मुलगी या दोघांचा व्हिसा (Visa) पास झालेला नव्हता आणि नेमकी हीच सबब पुढे करून कंपनीने ही सर्व रक्कम हडप केली, असा दावा मुरारका व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला आहे. मुरारका यांच्यासारख्या असंख्य पर्यटकांना फसविले गेले आहे, असा दावाही मुरारका यांनी केलेला आहे. 

मुरारका यांनी पैसे परत द्यावे म्हणून कंपनीच्या ऑफिसमध्ये धाव घेतली, मात्र तेथे त्यांना शिवीगाळ करण्यात आली, इतकेच नव्हे तर त्यांना ऑफिसमधील कॅबिनमध्ये आर्धा तास कोंडून ठेवण्यात आले. इतकेच नव्हे तर पोलिसांची व्हॅन बोलावतो, असे सांगून दमदाटीही केली. यावर मुरारका यांनी तेथून कशीबशी सुटका करून घेतली. व गोरेगाव येथील वनराई पोलीस स्थानक (Vanrai Police Station, Goregaon) गाठले. तेथे लेखी अर्जही केला. 

या लेखी अर्जावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. मुरारका यांच्यासारख्या फसविल्या गेलेल्या असंख्य पर्यटकांनी वनराई पोलीस स्थानकात अर्ज केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. मात्र पोलीस अधिकारी व ‘नीम’चे संचालक यांचे ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्यामुळे कोणतीच कारवाई होत नाही, अशी शंकाही काही पर्यटकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘स्प्राऊट्स’शी बोलताना व्यक्त केली. मुरारका यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन (Additional Police Commissioner Rajiv Jain, IPS ) यांची भेट घेतली, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. इतकेच नव्हे तर मुरारका यांनी त्यांचे वकील अशोक सरोगी ( Adv. Ashok Saraogi ) यांच्यामार्फत “नीम’ला कायदेशीर नोटीसही पाठवलेली आहे, मात्र या नोटिशीला कंपनीने अदयाप उत्तरही दिलेले नाही. 

‘नीम’चे बदनाम संचालक मनीष अग्रवाल यांनी यापूर्वीही असंख्य टुरिस्टना गंडा घातलेला आहे. इंटरनेटवर तसे अनुभव काही पर्यटकांनी शेअर केलेले आहेत. वरळीतील गुरुदत्त पै या एका पर्यटकाची अशीच फसवणूक करण्यात आलेली होती, त्यामुळे यासंबंधीची तक्रार त्यांनी मुंबईतील जिल्हा ग्राहक आयोगाकडे ( District Consumer Commission ) केलेली होती. त्यावर आयोगाने  १० नोव्हेंबर २०२२ मध्ये मनीष व अलका अग्रवाल या संचालकांना आर्थिक दंडही ठोठावला होता. 

‘नीम’ ही कंपनी ‘टाइम्स’च्या नवभारत टाइम्स, मुंबई मिरर यांसारख्या वृत्तपत्रांतून पहिल्या पानावर पूर्ण पान जाहिराती देतात. ( ही वृत्तपत्रे एरवी विश्वासार्हतेचा दावा करतात मात्र प्रत्यक्षात कोणतीही शहानिशा न करता, अशा ग्राहकांना फसविणाऱ्या कंपनीच्या पानभर जाहिराती प्रसिद्ध करतात.)

Times, Express ग्रुपचा advertorial हा तर सर्वात भयंकर प्रकार आहे. पत्रकारितेचा गळा घोटण्याचा हा प्रकार आहे. वास्तविक या ‘पेड न्यूज’च्या प्रकारावर बंदी घालण्यात यायला हवी.   

मिड- डे, नवभारत सारखी वृत्तपत्र तर त्यांना अवॉर्ड्सही देतात. (बऱ्याच वेळेला ही अवॉर्ड्स आर्थिक मोबदला घेऊन दिली जातात, असा आरोप केला जातो.) ही अवॉर्ड्स राज्यपाल, मंत्री यांच्या हस्ते देण्यात येतात. राजभवनात तर पैसे घेऊन अवॉर्ड्स दिली जातात, बोगस पीएचडीच्या पदव्या वाटल्या जातात. त्यामुळे सामान्य जनता, ग्राहकांची दिशाभूल होते व त्याच्या जीवावर या  कंपन्यांचे संचालक ग्राहकांची अक्षरश: लूट करायला मोकळे असतात. 

‘अग्रोहा ट्रस्ट’च्या नावाने अग्रवाल समाजातील सभासदांची दिशाभूल 

नीम या कंपनीचे ब्रोशर सर्वप्रथम ‘अग्रोहा विकास ट्रस्ट केंद्रीय समिती, मुंबई  (Agroha Vikas Trust ) यांच्यावतीने सचिन अग्रवाल (Sachin Agarwal ), अल्केश अग्रवाल ( Alkesh Agarwal) या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेले होते. त्यावर या दोघांचे फोटोही प्रसिद्ध करण्यात आलेले होते. तसेच अग्रसेन महाराजांचा फोटोही प्रकाशित करण्यात आलेला होता. या मंचाच्या मार्गदर्शनाखाली ही टूर आयोजित केलेली होती. तसे पत्रकही काढण्यात आलेले होते. मात्र फसवणूक झाल्यावर मुरारका यांनी सचिन अग्रवाल यांना वारंवार संपर्क साधला होता मात्र सचिन यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली, अशी माहिती मुरारका यांनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना दिली.  

वास्तविक अग्रोहा ट्रस्टने नीमसारख्या बदनाम कंपनीबरोबर टाय अप करताना किंवा ब्रोशर एकत्रितरित्या प्रसिद्ध करताना धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेतलेली होती काय? या ट्रस्टला जनतेची अशापद्धतीने दिशाभूल करण्याचा काय अधिकार आहे. इतकेच नव्हे तर सचिन अग्रवाल यांना या बदनाम कंपनीकडून गलेलठ्ठ कमिशन मिळते काय, असे प्रश्नही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अधिवक्ता दिलीप इनकर यांनी ‘स्प्राऊट्स’शी उपस्थित केले. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी मनीष अग्रवाल, अलका अग्रवाल व सचिन अग्रवाल यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. 


Related posts
Exclusive

Wilson College Students in Mumbai Prohibited from Sitting for Exams

1 Mins read
मुंबईत ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’
Exclusive

पुण्यातील आगामी 'अजय-अतुल लाईव्ह' कॉन्सर्ट स्थगित 

1 Mins read
मुंबईत ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’
Exclusive

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

1 Mins read
मुंबईत ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’