स्कॉटलंडविरुद्ध भारतीय संघात एकमेव बदल, अष्टपैलू खेळाडूला बाहेर ठेवत मिस्ट्री स्पीनरला संधी

भारत आणि स्कॉटलंड या सामन्याला आता काही वेळात सुरुवात होत आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून अखेर यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदा भारताने नाणेफेक जिंकली आहे. भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली असून मागील सामन्यातील संघामध्ये फक्त एक बदल केला आहे. अष्टपैलू शार्दूल ठाकूरला बेंचवर बसवून मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्तीला संघात घेतलं आहे.

मागील दोन सामन्यात शार्दूलला संधी देण्यात आली होती. पण त्याने बॅट किंवा बॉल अशा दोन्हीही काही कमाल केली नाही. त्यात आजच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचा वापर करण्याच्या दृष्टीने भारताने मिस्ट्री स्पीनर वरुणला संघात स्थान दिलं आहे. भारताकडे प्रथम गोलंदाजी असल्याने स्कॉटलंडला कमी धावांत बाद करुन लवकर आव्हान पूर्ण करुन मोठा विजय मिळवण हे लक्ष्य आहे.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघ

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी.

स्कॉटलंड संघ: जियॉर्ज मुन्से, कायल कोटजेर, मॅथ्यू क्रॉस, रिची बरीग्टंन, कॅलम मॅकलियॉड, मायकल लिस्क, ख्रिस ग्रेव्ह्स, मार्क वॅट, सॅफयन शरीफ, अलासदीर इवान्स, ब्रॅडली व्हिल.

Reporter

  • sprouts news network
    sprouts news network

Related News