पाकिस्तानात पेट्रोल 51 रु. लिटर, तर भारतात 100 च्या पार; का आहे इतकी तफावत? वाचा कारण

मागील काही दिवसांपासून देशभरात पेट्रोलच्या किमतीने आभाळ गाठले आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये पेट्रोल 100 च्या जवळ गेलं असून राजस्थान  आणि मध्य प्रदेश  काही भागांमध्ये पेट्रोलने 100 चा आकडा पार केला आहे. इतर देशांची तुलना (Petrol Price Comparison) करायची झाल्यास शेजरील पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा भाव 51 रुपये प्रतिलिटर आहे. तर भारतात याच्या दुप्पट आहे. खरंतर जगभरातील देशांचा विचार करायचा झाल्यास किंमतीच्या बाबतीत पाकिस्तान 31 व्या क्रमांकावर आहे तर भारत 115 व्या. पण असं का ? मागील एका वर्षाचा विचार करायचा झाल्यास 17 रुपये प्रतिलिटर किंमत वाढली आहे. यामध्ये चलनाचे अवमूल्यन आणि अंतरराष्ट्रीत बाजारभावाचा विचार करायचं झालं तर पाकिस्तान आणि अन्य देशांमध्ये या किमती दुप्पट तिप्पट असायला हव्यात. पण असं का नाही याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

शेजारी देशांमध्ये किंमत किती ?

भारताच्या शेजारील देशांशी तुलना करायचे झाल्यास सर्वच देशांमध्ये भारतापेक्षा पेट्रोल आणि डिझेल स्वस्त आहे. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यात जर डॉलरच्या अवमूल्यनावर किमती ठरल्या असत्या तर या देशांमध्ये भारतापेक्षाही कितीतरी अधिक पटीने या किमती जास्त हव्या होत्या. कारण भारतीय चालनापेक्षा या देशांचे चलन डॉलरच्या तुलनेत कैक पटीने लहान आहे. उधारणादाखल पाहायचं झाल्यास अमेरिकन चलनातील एक डॉलर भारतीय रुपयाच्या तुलनेत 72.56 रुपये आहे. तर पाकिस्तानी रुपयाच्या तुलनेत 159.26 रुपये आहे

फेब्रुवारी महिन्याचा विचार करायचं झाल्यास दिल्लीमध्ये 3.24 रुपये प्रति लीटर इतकी वाढ झाली आहे. याचबरोबर मागील महिन्यात देखील 10 वेळा पेट्रोलचे भाव वाढले आहेत. त्यामुळं एकूण 2 महिन्यात 6 रुपये प्रतिलिटर भाववाढ झाली आहे. जर याच गतीने पेट्रोल आणि डिझलचे भाव वाढत राहिलरें तर यावर्षी पेट्रोल 36 रुपये प्रतिलिटर वाढण्याची शक्यता आहे.

भारतात पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळा कर आकारते. युरोपमध्ये तेलाच्या किमती भारतापेक्षा जास्त आहेत परंतु टॅक्स कमी आहे. भारतात प्रत्येक राज्यात आणि शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या वेगवेगळ्या आहेत. जपान आणि अमेरिकेची तुलना केल्यास त्यांच्या आणि भारताच्या टॅक्सच्या आकडेवारीमध्ये खूप फरक आहे. अमेरिकेमध्ये भारताच्या तुलनेत 35 ते 40 टक्के पेट्रोल स्वस्त आहे. याच पद्धतीने पाकिस्तानमध्ये देखील एकच टॅक्सव्यवस्था असून वेगवेगळे कर आकारले जात नाहीत. त्यामुळं भारतात ही व्यवस्था कशी आहे हे एकदा समजून घ्या.

तुमच्या खिश्यावर अशा पद्धतीने पडतो बोझ

1 जानेवारीला दिल्लीमध्ये पेट्रोल 83.71 रुपये प्रतिलिटर होते. यामध्ये सुरुवातीला पेट्रोलची बेसिक किंमत ही 27.37 होती. यामध्ये 0.37 रुपये प्रति लीटर वाहतूक खर्च जोडावा लागला. त्यानंतर या किमतीवर कर आकारला जातो. यामध्ये केंद्र सरकार 32.98 रुपये एक्सईज ड्युटी घेते. त्यानंतर डिलरने 3.67 प्रतिलिटर कमिशन घेतलं. यानंतर राज्य सरकारने वहात आणि इतर करांच्या रूपात त्यामध्ये 19.32 रुपये कर जोडल्यानंतर ही रक्कम 83.71 रुपये होते. याच पद्धतीने प्रत्येक राज्यात वेगवेगळा कर आकारला जातो. त्यामुळं किमतींमध्ये फरक पडू शकतो.

Reporter

  • sprouts news network
    sprouts news network

Related News