खऱ्या आयुष्यात कोणाला पाहून हृता दुर्गेळेचं 'मन उडू उडू' झालं

झी मराठीवरील 'मनं उडू उडू' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. अल्पावधीतच यशाच्या शिखरावर पोहोचलेली ही मालिका आणि मालिकेतील कलाकारांवर अगदी संपूर्ण महाराष्ट्र भरभरून प्रेम करतं. तिचा एक वेगळा फॅन क्लब आहे. नुकतीच हृता दुर्गुळेने चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे.

ऋतानं प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे. चित्रपट दिग्दर्शक प्रतिक शाहसोबतचा एक खास फोटो शेअर करत तिनं चाहत्यांसोबत ही खास गोष्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत हृताने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. मुख्य म्हणजे हृताने या फोटोसोबत दिलेलं कॅप्शन सध्या चाहत्यांचं लक्ष वेधतयं.

शेअर केलेल्या फोटोला हृताने कॅप्शन दिलयं कि, ''मला तुझ्यामध्ये अशी आशा सापडली आहे. जी मला कधीच माहित नव्हती'' हृताने हा फोटो शेअर करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हृताने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोवर चाहत्यांसोबतच अनेक मराठी कलाकार देखील हृतावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

हृता दुर्गुळेचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी अभिनेत्री आहे. हृताच्या या यादीत 6 वा क्रमांक आहे. तसेच हृता ही पहिली अभिनेत्री आहे जिथे इंस्टाग्रामवर सर्वात जास्त फॅन्सग्रुप आहेत.

Reporter

  • sprouts news network
    sprouts news network

Related News