उद्धव ठाकरे लवकर बरे होण्याची सिद्धिविनायकाकडे प्रार्थना; ममतादीदी म्हणाल्या; जय मराठा, जय बांग्ला

उद्धव ठाकरे लवकर बरे होण्याची सिद्धिविनायकाकडे प्रार्थना; ममतादीदी म्हणाल्या; जय मराठा, जय बांग्ला

 ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आजपासून मुंबईत आल्या आहेत. मुंबईत पोहोचताच त्यांनी सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्या म्हणाल्या की उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यासाठी आले. मला इथे येऊन बरे वाटले. दर्शनासाठी मला चांगली सुविधा दिली. मी खूप आनंदी आहे असं म्हणत ‘जय मराठा, जय बांग्ला’ नारा ममता बॅनर्जींनी दिला. बंगालमध्येही गणपतीची उत्साहात पूजा केली जाते. मी मंदिर समितीचे, ट्रस्टीचे, पंडित, गुरुजी आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो, असंही त्या म्हणाल्या.

ममता यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर, शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाला भेट दिली आहे. त्या म्हणाल्या की तुकाराम ओंबळे यांनी जे देशासाठी काम केलं त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मी इथे आले आहे. यानंतर आज संध्याकाळीच त्या ट्रायडंट हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि संजय राऊत  यांची भेट घेणार आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे.

उद्या शरद पवारांसोबत बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या प्रकृतीमुळे भेटणं शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घोणार आहे. शरद पवार यांची देखील मी भेट घेणार आहे, त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. त्या म्हणाल्या, “मला जो संदश द्यायचा आहे, तो मी देईन. मुंबईला येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या घरी गेले नाही असं शक्य नाही. त्यामुळे मी शरद पवार यांच्या घरी उद्या जाणार आहे”, ममता म्हणाल्या.

दरम्यान, संजय राऊत यांनी आज दुपारी ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली. ‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. पण आरोग्यासंबंधी काही बंधनांमुळे उद्धव ठाकरे यांची भेट होत नाहीत. अशावेळी मी आणि आदित्य ठाकरे संध्याकाळी साडे सात वाजता ममताजी हॉटेल ड्रायडंट येथे भेटणार आहेत’, असं ट्विट राऊत यांनी केलंय.

दौऱ्याचं राजकीय महत्तव

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 1 डिसेंबरपर्यंत मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेण्यासाठी मुंबईत आल्याचं जाहीर केलं आहे.  या दौऱ्यावेळी त्या राज्यातील उद्योगपतींच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती मिळतेय. उद्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन भेट घेणार आहेत. तर उद्या दुपारी चार वाजता त्यांची मुंबईतील उद्योगपतींसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिच्या लग्नाच्या रिसेप्शनलाही त्या उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गोवा राज्य निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने जोरदार प्रचार सुरू केला आहे. गोव्यात पक्षाचा विस्तार केल्यानंतर ममता बॅनर्जी आपल्या पक्षाचा महाराष्ट्रातही विस्तार करणार का, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. की त्या महाविकास आघाडी सरकारला आपला पाठिंबा जाहीर करणार. शिवसेनेने ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाचे नेहमीच कौतुक केले आहे आणि पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या राज्यांच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात त्यांना पाठिंबा दिला आहे होता.

Reporter

  • sprouts news network
    sprouts news network

Related News