
प्रियांकाचा पती निक जोनस बॉलिवूडमध्ये करणार एण्ट्री?
- sprouts news network
- Dec 01, 2021
- 436 views
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. प्रियांका तिची जादू हॉलिवूडमध्ये करत असताना आता निक बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. एका मुलाखतीत निकने बॉलिवूड विषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. एवढचं नाही तर त्याच्या बोलण्यातून तो लवकरच बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार असे चित्र दिसत आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निक बॉलिवूड विषयी म्हणाला, “माझं लग्न प्रियांकासोबत झाल्यापासून मी बरेच भारतीय चित्रपट पाहिले आहेत. गाणी ऐकली आहेत. हे चित्रपट प्रेरणा देणारे असतात. मी भारतातच लग्न केलं. त्यानंतर ज्या-ज्या कार्यक्रमांच्या निमित्ताने भारतात गेलो तेव्हा अनेक बॉलिवूडमधल्या लोकांना भेटलो. त्यांच्याशी मी खूप गप्पा मारल्या आहेत. ते सगळेच प्रोत्साहित करत होते.”
पुढे प्रियांका म्हणाली, “आमच्या घरी पार्टी असली की आम्ही बॉलिवूडची गाणी लावतो. आमच्या घरी येणारे पाहूणे हे फक्त भारतीय नसतात तर अमेरिकेचेही असतात पण त्यांना देखील ही गाणी आवडतात. भारतीय चित्रपटांसाठी आणि तिथल्या गाण्यांसाठी माझ्याकडे एकच शब्द आहे तो म्हणजे ‘अभुतपूर्व’. मला अशा अप्रतिम चित्रपटसृष्टीत काम करायला नक्कीच आवडेल. मला जर चांगली ऑफर मिळाली तर मी नक्कीच काम करेन.”
दरम्यान, याच दिवशी म्हणजे १ डिसेंबर २०१८ रोजी निक आणि प्रियांकाने राजस्थानमध्ये लग्न केले होते. दरम्यान, प्रियांका ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटात दिसणार आहे, या चित्रपटात सेलिन डायोन आणि सॅम ह्यूघन मुख्य भूमिका साकारत आहेत. याशिवाय ती ‘मॅट्रिक्स ४’ आणि अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या बॉलिवूड चित्रपटातही दिसणार आहे.
Reporter