मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून कोट्यवधींचा भ्रष्टाचार आपत्ती व्यवस्थापन विभागाचे निर्णय वादात

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चक्क अंधारात ठेवून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी परस्पर कोट्यवधींची कंत्राटे दिली व त्याची बिले पण अदा केली. याप्रकरणी महालेखापालांनी गंभीर ताशेरे ओढले आहेत. त्यासंबंधातील अत्यंत महत्वाची व गोपनीय कागदपत्रेच 'स्प्राऊट्सच्या हाती लागली आहेत. यातूनच हा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचारही उघडकीस आलेला आहे.

सन २०२० मधील जून महिन्यात निसर्ग चक्री वादळाने अक्षरश: तांडव केले. यात कोकण जणू उद्ध्वस्त झाले. लाखो कोकणवासियांनी आयुष्यभर उपसलेले कष्ट अक्षरश: मातीमोल झाले आणि याच संकटाचा फायदा उचलण्याचे काम राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.


या वादळी परिस्थितीचे शुटिंग करणे, त्याची डॉक्क्युमेंट्री तयार करणे. थीम सॉंग तयार करणे, जिंगल्स बनविणे या कामासाठी तीन प्रस्ताव मुख्य सचिवांना पाठविण्यात आले होते. या प्रस्तावावर स्पष्ट शब्दांत नामंजूर असा शेरा मारण्यात आलेला होता.

अर्थ खात्याच्या या शेऱ्याकडे सपशेल दुर्लक्ष करून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन खात्याने हे  ४ कोटी ७८ लाख रुपयांचे कंत्राट स्पॅन कम्युनिकेशन या कंपनीला तीन वेगवेगळ्या कामांसाठी दिले. याहून धक्कादायक बाब म्हणजे आर्थिक निकषानुसार या कंपनीचे इतर कंपन्यांच्या तुलनेत जे गुण आहेत, ते कमी आहेत, परंतु हे गुण वाढविण्यात आले. आणि त्यानंतर हे गुण वाढविण्यात आले. त्यानंतर या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले, अशी बाबही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेली आहे.

सरकारी नियमाप्रमाणे कोणत्याही कामासाठी शासन निर्णय काढावा लागतो, पण तो न काढताच परस्पर कंत्राट देवून बिले काढण्यात आली. स्पॅन कम्युनिकेशनचे संजीव कुमार यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मंत्री वडेट्टीवार यांचे पीए राजू संतोषवार याना संपर्क साधला असता त्यांनी ते बाहेरगावी आहेत, तुम्ही पीएस रामटेके याना संपर्क करा, असे सांगितले.

महालेखापालांचे ताशेरे अर्थखात्याने मंजुरी नाकारूनही आपत्ती व्यवस्थापन खात्याने काढली जाहिरात सर्वात कमी गुण असलेल्या स्पॅन कम्युनिकेशनला गुण वाढवून कामाचे दिले कंत्राट
तिन्ही कामे एकाच जाहिरातीची होती, पण वर्क ऑर्डर काढल्या वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेविना परस्पर ४ कोटी ७८ लाखाची बिले करून घेतली मंजूर
बिले अदा करताना कामाचे प्रमाणीकरण करणे किंवा रेकॉर्ड तपासले गेले नाहीत एजन्सीने खर्चाचा तपशील दिलेला नाही, त्यामुळे केलेले कामही सोशल मीडियावर नाही

Reporter

  • Unmesh Gujarathi
    Unmesh Gujarathi

Related News