मालेगाव बाॅम्बस्फोट 2008 : आतापर्यंत तब्बल 17 साक्षीदारांनी फिरवली साक्ष!

सर्वाधिक चर्चेत असलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट २००८ मध्ये आरोपींची धरपकड करण्यात आली. त्यामध्ये सर्व आरोपी अभिनव भारत या संघटनेशी संबंधित असल्याचे दिसून आले. प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे आरोपी असल्याने देशात हिंदू दहशतवादी ही संकल्पना रुजवण्यात आली. त्यामुळे या खटल्याचे राजकारण अधिक झाले. हा खटला सुरूच झाला नाही. खटला सुरु न करता आरोपींना तब्बल ९ वर्षे कारागृहात सडवण्यात आले. अखेर २०१७ साली त्यांना जामीन देण्यात आला. त्यानंतर तब्बल १३ वर्षानंतर हा खटला सुरु झाला. या प्रकरणात एक एक करत साक्षीदार त्यांची साक्ष फिरवू लागले आहेत. म्हणून हा खटला आता कमकुवत होऊ लागला आहे. 

साक्षीदारांच्या साक्षीची उलट तपासणी सुरु

या प्रकरणात लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह, मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह ८ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर तब्बल १३ वर्षांनी खटला सुरु झाला आहे. मात्र त्यावेळी ज्या साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेण्यात आले होते, त्या साक्षीदारांच्या साक्षीची उलट तपासणी आता सुरु झाली आहे. यामध्ये यातील एक-एक करत साक्षीदार त्यांच्या साक्ष फिरवत आहेत. अशा रीतीने आता पर्यंत १७ साक्षीदारांनी त्यांच्या साक्ष फिरवल्या आहेत. या प्रकरणात एकूण २२० साक्षीदार नोंदवले आहेत. या खटल्यात साक्ष फिरवणाऱ्या १७व्या साक्षीदाराने न्यायालयात दावा केला की, एटीएसने आपल्याला अटक करुन बेकायदेशीरपणे कोठडीत डांबले. तसेच आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएसच्या ) नेत्यांची नावे घेण्यास भाग पाडले. 
नाव घेण्यास भाग पाडले.

मागील महिन्याच्या सुरुवातीला मालेगाव बाॅम्बस्फोट खटल्यातील एका साक्षीदाराने आपली साक्ष फिरवत दावा केला होता की, त्याला धमकी देऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच इतर आसएसएस नेत्यांची नावे घेण्यास एटीएसने भाग पाडले होते. साक्षीदाराने केलेल्या या दाव्यानंतर, आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांनी काॅंग्रेस नेत्यांना माफी मागण्यास सांगितले होते.

असे आहे प्रकरण 
29 सप्टेंबर 2008 रोजी मुंबईपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या नाशिकच्या मालेगाव शहरातील एका मशिदीजवळ मोटार सायकलवर बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणातील आरोपींमध्ये लोकसभा सदस्य प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, शुदाकर दिवेडी, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे, हे सर्व सध्या जामिनावर बाहेर आहेत.

Reporter

  • Unmesh Gujarathi
    Unmesh Gujarathi

Related News