आधी पाकिस्तानने 'कट' केलं भारताचं नाव, वादाची ठिणगी पेटणार!

टी-20 वर्ल्ड कपला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 17 ऑक्टोबरपासून स्पर्धेच्या पहिल्या राऊंडला सुरुवात होणार आहे, त्याआधी बहुतेक टीम युएईमध्ये दाखल होत आहेत. पहिल्या राऊंडमध्ये 8 टीम सुपर-12 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी खेळतील. टी-20 वर्ल्ड कपसाठी आता प्रत्येक देशाच्या टीम त्यांची जर्सी लॉन्च करत आहेत, पण या जर्सीवरूनच आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

यंदाचा टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये होणार असला तरी त्याचं आयोजन भारताकडून केलं जाणार आहे. त्यामुळे जर्सीवर आयोजक देश म्हणून भारताचं नाव लिहिणं गरजेचं आहे. पाकिस्तानने मात्र भारताचं नाव लिहिण्याऐवजी युएईचं  नाव लिहिलं आहे. पाकिस्तानच्या या लाजिरवाण्या हरकतीमुळे बीसीसीआय (BCCI) मात्र नाराज होण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या नियमानुसार स्पर्धेसाठीच्या जर्सीच्या उजव्या बाजूला आयोजक देशाचं नाव असणं बंधनकारक आहे. या नियमानुसार  असं जर्सीवर लिहिलेलं असलं पाहिजे, पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पाकिस्तानच्या जर्सीवर पाकिस्तानने भारताऐवजी युएई लिहिलं आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात त्याच्या जर्सीवर लिहिलं आहे. पाकिस्तानने अजून अधिकृतरित्या ही जर्सी लॉन्च केलेली नाही, त्यामुळे अशाचप्रकारची जर्सी जर लॉन्च करण्यात आली तर आयसीसी किंवा बीसीसीआय यावर आक्षेप घेणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.


Reporter

  • sprouts news network
    sprouts news network

Related News