
T20 World Cup 2021 मध्ये पाकिस्तानची पहिली लढत भारताशी, सामन्याच्या काही दिवस आधीच संघाला मोठा झटका
- sprouts news network
- Oct 15, 2021
- 331 views
बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित टी-20 विश्वचषकासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी सज्ज झाले आहेत. काही दिवसांतच या स्पर्धेचा थरार युएईत पाहायला मिळणार आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघ आपआपली रणनीती तयार करत असून काही संघानी आपले अंतिम खेळाडूंची घोषणाही केली आहे. बऱ्याच आधी 15 सदस्यीय संघाची घोषणा करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाने त्यांच्या संघात तीन बदल केले. पण या बदलानंतर आता संघाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. संघाचे परफॉर्मंस प्रशिक्षक प्रमुख ग्रँट ब्रॅडबर्न यांनी राजीनामा दिला आहे. न्यूझीलंडचे माजी खेळाडू असणारे ग्रँट 3 वर्षांपासून पाकिस्तान संघासोबत होते. सप्टेंबर 2018 ते जून 2020 या काळात त्यांनी पाकिस्तान संघाचे फील्डिंग कोच म्हणूनही कार्यभार सांभाळला होता.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार ब्रॅडबर्न म्हणाले, ”पाकिस्तान क्रिकेटसोबत काम करणं माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. मी सोनेरी आठवणी आणि शानदार अनुभव सोबत घेऊन जात आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी पीसीबीचे धन्यवाद देऊ इच्छितो.” विशेष गोष्ट म्हणजे रमीज राजा पीसीबीचा चेअरमन होताच ब्रॅडबर्न हा पाचवा अधिकारी आहे. ज्याने संघाची साथ सोडली आहे. याआधी पाकिस्तानचा मुख्य कोच मिसबाह उल हक, गोलंदाजी कोच वकार युनूस, सीईओ वसीम खान आणि मार्केटिंग हेड बाबर हमीद यांनीही राजीनामा दिला आहे.
पाकिस्तानकडून संघात 3 बदल
17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघ आपआपली रणनीती तयार करत असून काही संघानी आपल्या अंतिम खेळाडूंची घोषणाही केली आहे. सर्वात आधी 15 सदस्यीय संघाची घोषणा करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघानेत्यांच्या संघात तीन बदल केले आहेत. यामध्ये एक बदल म्हणजे पाकिस्तानकडून एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक ठोकणारा एकमेव खेळाडू फखर जमान (Fakhar Zaman) याला राखीवमधून 15 सदस्यीय संघात जागा देण्यात आली आहे. याशिवाय संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) आणि हैदर अली (Haider Ali) यांनाही 15 सदस्यीय संघात जागा मिळाली आहे. सरफराज अहमद याला आजम खान आणि हैदर अलीला मोहम्मद हसनैन यांच्या जागेवर घेण्यात आलं आहे. तर फखर जमानला खुशदिल शाहच्या जागी खेळायची संधी मिळाली आहे. आता खुशदिल शाह राखीव खेळाडूंमध्ये असेल.
Reporter