Site icon Sprouts News

‘डी. वाय. पाटील’च्या डीनपदी बोगस डॉक्टर

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

महाराष्ट्रातील नवी मुंबईत ‘डी. वाय. पाटील’ या विद्यापीठाचे ‘स्कूल ऑफ आयुर्वेद’ नावाचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या ‘डीन’ या प्रमुखपदावर महेशकुमार हरित हा भामटा अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. विशेष म्हणजे या भामट्याची ‘डॉक्टर’ची पदवी बोगस आहे. अशी खळबळजनक माहिती स्प्राऊटसच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी) हाती आलेली आहे.

महेशकुमार हरित Mahesh Kumar Harit हा तोतया डॉक्टर आहे. या तोतयाची इयत्ता १० वी पासूनची सर्वच कागदपत्रे बनावट व नकली आहेत, याचा भांडाफोड करणाऱ्या बातम्या ‘स्प्राऊट्स’ने याआधीही सर्वप्रथम दिल्या होत्या.

‘स्प्राऊट्स’च्या या बातम्यांची युनिव्हर्सिटी ग्रॅन्ड कमिशनने तातडीने (UGC ) दखलही घेतली व विद्यापीठ प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र विद्यापीठाने ‘यूजीसी’च्या या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवलेली आहे.

सब गोलमाल है!

* महेशकुमार या तोतयाने १० वी व १२वीची प्रमाणपत्रे हातानेच लिहिलेली आहेत. त्यावर वडिलांचे नाव सीताराम वैद्य असे लिहिले आहे. तसेच दोन्ही मार्कशीट्स डुप्लिकेट स्वरूपात मिळवलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर याने १० वी १९८५ मध्ये व पुढच्याच वर्षी म्हणजेच १९८६ मध्ये १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण केल्याची कागदपत्रे जोडलेली आहेत.

* केवळ १० वी व १२ वी च नव्हे तर ‘बीएएमएस’ व त्यानंतर लागणारे अनुभव प्रमाणपत्रे, जॉइनिंग लेटर्स ही सर्वच कागदपत्रे बनावट आहेत, ही सर्व कागदपत्रे ‘स्प्राऊट्स’ला माहिती अधिकारातून प्राप्त झालेली आहेत.

* विशेष म्हणजे या तोतया डॉक्टरची सर्व कागदपत्रे बनावट आहेत, तरीही Maharashtra Council of Indian Medicine (एमसीआयएम) या संघटनेचे महाभ्रष्ट रजिस्टर डॉ. दिलीप वांगे यांनी या तोतया डॉक्टरच्या पदवीचे रजिस्ट्रेशन केले व वारंवार नूतनीकरण केले असल्याचे आढळून येते. याबाबत असंख्य तक्रारी होवूनही वांगे यांनी या तक्रारींची कोणतीही दखल घेतलेली नाही.

* डॉ. दिलीप वांगे हे ‘एमसीआयएम’मध्ये मागील १५ वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत आहेत. त्यांनी या संस्थेत असंख्य महाघोटाळे केलेले आहेत व त्यातून कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केलेली आहे.


Exit mobile version