Site icon Sprouts News

पॅरोलवर आलेला खुनी व बलात्कारी राम रहीमही झाला बोगस पीएचडीने सन्मानित

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive Story

राम रहीम हा स्वयंघोषित धर्मगुरू आहे. खून, बलात्कार यांसारख्या गंभीर आरोपात तो सध्या आजन्म जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. भाजपच्या ‘दयाळू’ सरकारने त्याला सध्या सातव्यांदा पॅरोलवर सोडले आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्याने तात्काळ प्रतिमा संवर्धन (Image Building ) करायचे ठरवले. त्यासाठी स्वतःच्या वाढदिवसाचे निमित्त केले. आश्रमातील भव्यदिव्य कार्यक्रमात या नववी नापास असणाऱ्या भोंदू बाबाने स्वतःच्या पदरात ऑनररी पीएचडी पाडून घेतली व नावापुढे डॉक्टर म्हणून मिरवायलाही सुरुवात केलेली आहे. मात्र ही पीएचडी चक्क बोगस आहे, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’ (Sprouts) या इंग्रजी दैनिकाच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी ) हाती पुराव्यानिशी लागलेली आहे.

स्वयंघोषित धर्मगुरू गुरमीत राम रहीम सिंग ( Gurmeet Ram Rahim Singh Insan ) हा डेरा सच्चा सौदा ( Dera Sacha Sauda) या शीख धर्मातील उपपंथाचा प्रमुख आहे. या भोंदू बाबाची हरियाणा व पंजाबमध्ये आजही दहशत आहे. मात्र पैसा व राजकारण्यांशी असलेले लागेबांधे यामुळे याचे काळे कारनामे आजपर्यंत फारसे बाहेर आलेले नाहीत. त्याचे सध्या बाहेर आलेले कारनामे हे केवळ हिमनगाचे टोक आहे.

या भोंदू बाबाने दोन साध्वी महिलांवर पाशवी बलात्कार केला व एका सच्चा पत्रकाराची (Ramchandra Chhatrapati ) हत्या केली. त्यामुळे त्याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सध्या हा भोंदू हरियाणा राज्यातील ‘रोहतक’ येथील तुरुंगात २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.

या भोंदू बाबाला मानणारे लाखो अनुयायी ( फॉलोअर्स) आहेत. हरियाणा व पंजाब या राज्यामध्ये ही मोठी व्होट बँक मानली जाते. त्यामुळे या राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सुरुवातीला त्याला अटक करण्यास टाळाटाळ केली. मात्र सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आदेश देताच सरकारला अटक करणे भाग पडले.

अटक केल्यावरही हरियाणाचे भाजप सरकार या भोंदू बाबावर विशेष मेहेरबान आहे. त्यामुळेच अटक झाल्यानंतर म्हणजेच मागील अडीच वर्षांत त्याला सातव्यांदा पॅरोलवर सोडण्यात आले आहे. त्याच्यासाठी पॅरोल हा नियम आहे, तर सजा अपवाद आहे. त्यामुळेच भाजपच्या हरियाणा सरकारच्या गृहमंत्र्यांनी हा भोंदू बाबा ‘hardcore criminal’ नाही, असे अधिकृतपणे कारण देऊन त्याला सातव्यांदा पॅरोल मंजूर केला. सध्या हा भोंदू बाबा ४० दिवसांसाठी पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेला आहे.

पॅरोलवर येताच या भोंदू बाबाने १५ ऑगस्ट रोजी त्याचा वाढदिवस बागपात (Baghpat ) जिल्ह्यातील शाह सतनाम ( Shah Satnam) येथील आश्रमात धुमधडाक्यात साजरा केला. इतकेच नव्हे तर त्याने Theophany University या बोगस विद्यापीठाची पदवीही स्वीकारली.

Theophany University ही बोगस आहे. या कथित विद्यापीठाने त्यांच्या वेबसाईटवर ‘हैती’ (Haiti ) या देशात त्याचे मुख्यालय असल्याचा दावा केलेला आहे. मात्र हा दावा सपशेल खोटा आहे. या कथित विद्यापिठाच्या जागेवर कोणतेही विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्था नाही. वेबसाईटवर दाखवलेले विद्यापीठाचे चित्र हे त्या विद्यापीठाचे नाही, तर भलत्याच विद्यापीठाचे आहे.

इतकेच नव्हे तर या वेबसाईटवर ‘हैती’चे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सचे ( Ministry Of Commerce ) पत्र दाखवण्यात आलेले आहे. मात्र ते पत्रही बोगस आहे. अर्थात अस्तित्वात नसलेल्या या विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission- UGC ) मान्यता देण्याचा प्रश्नही उद्भवत नाही.  

या विद्यापीठाने Theophany University व Theophany International University या दोन नावाने वेबसाईट प्रकाशित केलेल्या आहेत. या दोन्ही वेबसाईटचा लूक हा परदेशी व अत्यंत आकर्षक आहे. त्यामळे शेकडो विद्यार्थी या भुलभुलय्याला बळी पडत आहेत.

अभिषेक पांडे ( Abhishek Pandey ) हा भामटा सध्या भारतात या बोगस विद्यापीठाच्या माध्यमातून बोगस ऑनररी पीएचडी विकत आहे. त्यासाठी तो प्रत्येकी १० हजारांपासून ते दीड लाखापर्यंत फी उकळतो. जितका ग्राहक अज्ञानी तितकी किंमत जास्त आकारली जाते. आतापर्यंत या भामट्याने शेकडो विद्यार्थ्यांची दिशाभूल केलेली आहे व कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केलेली आहे, त्यामुळे या गैरव्यवहाराची आयकर खात्याने चौकशी करावी, अशी मागणी ‘स्प्राऊट्स’तर्फे करण्यात येणार आहे.  

हनीप्रीतनेही मिळवली बोगस पीएचडी

● थिओफनी ( Theophany University ) या बोगस विद्यापीठाच्या प्रतिनिधीने राम रहीम या भोंदू बाबाला प्रथम ही ऑनररी पीएचडी पदवी त्याच्या आश्रमात येऊन दिली व त्यानंतर तात्काळ त्याची कथित दत्तक मुलगी हनीप्रीत इन्सान Honeypreet Insan (original name: Priyanka Taneja) हिलाही बोगस पीएचडी दिली. ( हनीप्रीत इन्सान- आताची रुहानी- Rohani  व भोंदू राम रहीम बाबा यांचे शारीरिक संबंध आहेत, असा आरोप हनीप्रीतचे पूर्वाश्रमीचे पती विश्वास गुप्ता- Vishwas Gupta यांनी यापूर्वी अनेकदा केला आहे ). सन २००९ साली ती फरारही झालेली होती.  

● या भोंदू राम रहीम बाबाला २५ जून २०१६ रोजी लंडन येथील वर्ल्ड रेकॉर्ड्स युनिव्हर्सिटीच्या (World Records University) प्रतिनिधीने आश्रमात येऊन मानद पीएचडी दिलेली होती. त्यासाठी या भोंदू बाबाने आश्रमात भव्य कार्यक्रमही आयोजित केलेला होता. मात्र या विद्यापीठाला त्याचे मुख्यालय असलेल्या युनायटेड किंग्डम (United Kingdom ) येथील सरकारचीही साधी मान्यता नव्हती. ही बाब उघडकीस आली व त्यामुळे ही पदवीही रद्द (revoke ) करण्यात आली.

A list of fake universities awarding bogus Ph.D. degrees has been given here for the information of our valuable readers:

► The Open International University of Complementary Medicine, Sri Lanka
► University of America Hawaii and Inox International University
► World Mystic Science Institute (OPC) Private Limited
► University of South, America,
► Southwestern American University
► The American University, USA,
► Zoroastrian University,
► Mahatma Gandhi Global Peace Foundation (NGO)
► Empower Social and Education Trust (NGO)
► Nelson Mandela Nobel Award Academy (NGO)
► Diplomatic Mission Global Peace (NGO)
► Vinayaka Missions Singhania.
► American Heritage University of Southern California (AHUSC)
► Peace University
► Dadasaheb Phalke Icon Awards Films: NGO
► World Human Protection Commission- NGO
► Trinity World University, UK
► St. Mother Teresa University
► University of Macaria
► American University of Global Peace
► Jeeva Theological Open University
► World Peace Institute of United Nations
► Global Human Peace University
► Bharat Virtual University for Peace and Education
► National Global Peace University
► Ballsbridge University
► Shri Dadasaheb Phalke International Award Film Foundation (NGO)
► International Open University of Humanity Health, Science and Peace, USA
► Harshal University
► International Internship University
► British National University of Queen Mary.
► Jordan River University
► Boston Imperial University
► The University of Macaria
► Theophany University
► Dayspring Christian University
► South Western American University
► Global Triumph Virtual University
► Vikramsheela Hindi Vidyapeeth
► Jnana Deepa University (Pune)
► Oxfaa University
► Mount Elbert Central University
► McSTEM Eduversity, USA
► Maa Bhuvaneshwari International University
► The Institute of Entrepreneurship and Management Studies (IEMS)
► Ecole Superieure Robert de Sorbon
► Central Christian University


Exit mobile version