Education

बोगस विद्यापीठवाल्याने राज्यपालांना दिले बोगस पीएचडी वाटप कार्यक्रमाचे आमंत्रण 

1 Mins read

The revenue worth crores lost due to the spurious medicine manufacturing companies

The revenue worth crores lost due to the spurious medicine manufacturing companies

Bogus university invites the governor for a fake Ph.D. allotment programme 

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनात चक्क बोगस विद्यापीठाच्या संस्थापकाचा सत्कार केला. त्याच्याशी निवांत चर्चा केली, इतकेच नव्हे त्याच्याकडून या विद्यापीठाच्यावतीने दिल्ली येथील होणाऱ्या बोगस पीएचडी पदव्या वाटपाच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही स्वीकारले, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.

इंटरनॅशनल इंटर्नशिप युनिव्हर्सिटी – International Internship University (IIU) हे संपूर्णतः बोगस विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची जगातील कोणत्याही देशात नोंदणी नाही. पियुष पंडित (Peeyush Pandit ) हा भामटा या बोगस विद्यापीठाचा संस्थापक आहे. या भामट्याने आतापर्यंत शेकडो जणांना बोगस पीएचडी विकल्या आहेत. यातून त्याने कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केली आहे. या भामट्याला महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा तोतया सचिव उल्हास मुणगेकर याची साथ आहे, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या ‘एसआयटी’च्या हाती आलेली आहे.

पीयूष पंडित हा देशविदेशातील भारतीय लोकांना आपल्या जाळ्यात ओढतो. त्यांना दिल्ली येथे बोलावून मोठ्या हॉटेलमधील कार्यक्रमात बोगस पीएचडी पदव्या विकतो. ही बोगस पीएचडी अधिकृत वाटावी, यासाठी हा भामटा कार्यक्रमाला पोलीस, वकील आणि सरकारी कार्यालयातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना बोलावतो व त्यांच्या हस्ते बोगस पीएचडी देतो, असे आढळून आलेले आहे.

दिल्ली येथील पोलीस ऑफिसर किरण सेठी यांना या भामट्याने एका कार्यक्रमात आमंत्रित केले होते. त्यांच्या हस्ते काही जणांना बोगस पीएचडी वाटण्यात आल्या.

पंडित नावाच्या भामट्याने राज्यपाल कोश्यारी यांना चक्क त्याच्या फेक विद्यापीठाचे ब्रोशर व इतर भेटवस्तूही दिलेल्या आहेत, सोबत त्याने आमंत्रण पत्रिकाही दिली. ‘स्प्राऊट्स’च्या वाचकांसाठी हा exclusive फोटो आम्ही प्रकाशित करीत आहोत.

या बोगस आभासी विद्यापीठाच्या बोर्डावर मुंबईतील Panbai International School च्या मुख्याध्यापिका प्रतिभा मिश्रा, भानू प्रताप सिंह, के. एल. गांजू, टी. एन. शिरीष कुमार, संदीप मारवाह, प्रकाश जोशी, संजीव सेहगल, एन. डी. माथूर, श्याम सुंदर पाठक यांचा समावेश आहे.

भगत सिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. याशिवाय ते महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे कुलपती आहेत. मात्र त्यांच्या कारकिर्दीत शिक्षणाचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावला आहे. याशिवाय भ्रष्टाचारही प्रचंड बोकाळलेला आहे. ‘स्प्राऊट्स’ने या भ्रष्टाचाराविरोधात रान उठवले. राज्यपालांशी लेखी पत्रव्यवहार केला, प्रसंगी त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यासंबंधीत कागदपत्रांच्या फाईल्सही दिल्या. मात्र राज्यपालांना केवळ सत्कार समारंभाचे कार्यक्रम करण्यातच रस आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, तरीही राज्यपाल बेफिकीर आहेत.  

राज्यपालांचे सचिव उल्हास मुणगेकर हे नियमबाह्य पद्धतीने बसलेले आहेत. राजभवनात बोगस पीएचडी पदव्या  वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला. बोगस पीएचडी देणाऱ्या संस्थेनेही राज्यपाल कोश्यारी यांचे हस्ते या सर्वांचा सत्कार केला. इतकेच नव्हे तर आतापर्यंत असंख्य बोगस विद्यापीठांना जन्म देणारा मधू क्रिशन याचाही राज्यपालांनी सत्कार केला, त्याच्याबरोबर ब्रेकफास्ट केला. यातून ही बोगस विद्यापीठे अधिकृत असल्याचा संदेश जाईल याची व्यवस्था केली. या सर्व गैरकृत्यांचा मास्टरमाइंड हा मुणगेकर आहे. 

मुणगेकर या भामट्याची कारकीर्द अत्यंत भ्रष्ट आहे. राजभवनातून हा भामटा बोगस पीएचडीचे रॅकेट चालवत आहे. याबाबत ‘स्प्राऊट्स’ने वारंवार तक्रारी करूनही राज्यपाल कोश्यारी व राजभवन प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे, मात्र यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार अधिकाधिक बोकाळत चाललेला आहे व विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. 

A list of fake universities awarding bogus Ph.D. degrees has been given here for the information of our valuable readers:

► The Open International

University of complementary medicine, Sri Lanka

► University of America Hawaii and Inox International University

► Commonwealth Vocational University, Tonga

► University of South, America,

► Southwestern American University

► The American University, USA,

► Zorashtriyan University,

► Sorbonne University, France,

► Mahatma Gandhi Global peace Foundation (NGO)

► Empower Social and Education Trust (NGO).

► Nelson Mandela Nobel Award Academy – NGO

► Diplomatic Mission Global Peace – NGO

► Manav Bharti University (MBU) Himachal Pradesh

► Manav Bharti University, Solan

► Vinayaka Missions Singhania.

► Chhatrapati Shahuji Maharaj University from Kanpur

► American Heritage University of Southern California (AHUSC)

► Peace University

► Dadasaheb Phalke Icon Awards Films – NGO

► Trinity World University, UK

► St. Mother Teresa University

► University of Macaria

► American University of Global Peace

► Jeeva Theological Open University

► World Peace Institute of United Nations

► Global Human Peace University

► Bharat Virtual University for peace and Education

► National global Peace University

► Ballsbridge University

► Shri Dadasaheb Phalke International Award Film Foundation (NGO)

► International Open University of Humanity Health, Science and Peace, USA

► Harshal University

► International Internship University

► British National University of Queen Mary.

► Jordan River University

► Boston Imperial University

► The University of Macaria

► Theophany University

► Dayspring Christan University

► South Western American University

► Global Triumph Virtual University

► Veekramsheela Hindi Vidyapeeth

► Jnana Deepa University (Pune)

►Oxfaa University


Related posts
EducationTrending News

Fake PhD Racket Exposed: Vivek Bindra, Madhu Krishan Under Scrutiny.

5 Mins read
Fake PhD Honorary Doctorates for Sale in India • Vivek Bindra, Madhu Krishan Under Fire • Sprouts News Exposes Fake PhD Degree…
EducationTrending News

What is Cursor AI Used For? An In-Depth Guide for Developers and Tech Enthusiasts

4 Mins read
Cursor AI: AI CODE EDITOR:  In the fast-evolving world of artificial intelligence, tools like Cursor AI are emerging as game-changers for developers…
EducationExclusive

NMC Probes Illegal MBBS Fees of ₹32 Lakh at DY Patil College to Fifth-Year Student.

2 Mins read
NMC Cracks Down on Illegal MBBS Fees • DY Patil College Faces MBBS Fee Fraud Probe • DMER Under Fire for MBBS…
error: <b>Alert: </b>Content selection is disabled!!