Education

राजभवनात भामट्यांचा वावर 

1 Mins read

उन्मेष गुजराथी
स्प्राउट्स एक्सक्लूसिव

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना सवंग प्रसिद्धीची भलतीच हौस आहे. यासाठी ते ‘राज्यपाल’ या घटनात्मक पदाचा व ‘राजभवन’ या सरकारी वास्तूचा दररोज दुरुपयोग करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी मधू क्रिशन. (Madhu Krishan), लोकेश मुनी (Lokesh Muni), पियुष पंडित ( Peeyush Pandit ), योगेश लखानी (Yogesh Lakhani ) – Bright Outdoor Media अशा असंख्य बोगस पीएचडी विकणाऱ्यांचा जाहीर सत्कार केला होता. याचपद्धतीने त्यांनी ९ जानेवारी रोजी हरित कुमार या बोगस डॉक्टरचाही राज्यपालांनी राजभवनात जाहीर सत्कार केला, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला मिळालेली आहे.   राज्यपाल कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आतापर्यंत अंडरवर्ल्डसंबंधित गुन्हेगार, आरोपी, समाजकंटक यांसह असंख्य समजविघातक कृत्ये करणाऱ्यांचाही राजभवनात सत्कार केला आहे. आजही ते दररोज राजभवनात (Raj Bhavan) शेकडो जणांना पुरस्कार देवून गौरवितात. 

कोश्यारी यांनी आतापर्यंत एकही सामाजिक किंवा शैक्षणिक प्रश्न सोडविलेला नाही. इतकेच नव्हे तर अनके भ्रष्ट लोकांना राजभवनात आमंत्रण देवून सन्मानित केलेले आहे. व त्यांचे सामाजिकदृष्ट्या शुद्धीकरणही केलेले आहे. 

महाराष्ट्रातील नवी मुंबईत ‘डी. वाय. पाटील’ (D. Y. Patil University ) या विद्यापीठाचे ‘स्कूल ऑफ आयुर्वेद’ नावाचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या ‘डीन’ या प्रमुखपदावर महेशकुमार हरित (Mahesh Kumar Harit ) हा भामटा अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. विशेष म्हणजे या भामट्याची १० वी व १२ सह ‘डॉक्टर’ची पदवीही बोगस आहे. मात्र तरीही  Maharashtra Council of Indian Medicine (एमसीआयएम) चे महाभ्रष्ट रजिस्टर डॉ. दिलीप वांगे ( Dr. Dilip Wange) यांनी त्याचे रजिस्ट्रेशन व नूतनीकरणही केलेले आहे. हे सर्व काम त्यांनी नियमबाह्य पद्धतीने केलेले आहे. 

हरित या भामट्यावर त्वरित कारवाई करा, असा आदेशही युनिव्हर्सिटी ग्रॅन्ड कमिशनने ( UGC ) तातडीने दिलेला आहे. मात्र या आदेशालाही ‘डी. वाय. पाटील’ या विद्यापीठाने केराची टोपली दाखवलेली आहे. आजही हे प्रकरण ठाणे सत्र न्यायालयात चालू आहे. याशिवाय अनेक सरकारी यंत्रणांमार्फत या भामट्याची चौकशी चालू आहे. मात्र ‘डी. वाय. पाटील’ हे विद्यापीठ या भामट्याला कायमच पाठीशी घालत आहे. हरित व त्याला खोट्या कामात सहकार्य करणारा डॉ. दिलीप वांगे हे महाभ्रष्ट आहेत. वांगे यांनी त्यांच्या सलग १५ वर्षांच्या काळात कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केलेली आहे. या सर्वांच्या भ्रष्ट कारकिर्दीला आशीर्वाद दिला आहे तो राज्यपाल कोश्यारी यांच्या उल्हास मुणगेकर या कथित सचिवाने. उल्हास मुणगेकर (Ulhas Mungekar) या सचिवाची नेमणूक ही बेकायदेशीर पद्धतीने झालेली आहे. या तिसऱ्या भामट्यामुळेच हरित, डॉ. वांगे या भामट्यांचा राजभवनातील वावर वाढलेला आहे. 

Related posts
Education

मोहनबुवा रामदासी यांनाही सुटला बोगस पीएचडीचा मोह

1 Mins read
उन्मेष गुजराथीस्प्राऊट्स Exclusive Unmesh Gujarathi ‘जय जय रघुवीर समर्थचा गजर’ करीत समर्थ रामदास स्वामींनी अध्यात्म व बलोपासनेचा संदेश दिला. समर्थांच्या या कार्याचा…
Education

मोहनबुवा रामदासी यांनाही सुटला बोगस पीएचडीचा मोह

1 Mins read
उन्मेष गुजराथीस्प्राऊट्स Exclusive ‘जय जय रघुवीर समर्थचा गजर’ करीत समर्थ रामदास स्वामींनी अध्यात्म व बलोपासनेचा संदेश दिला. समर्थांच्या या कार्याचा प्रसार सध्या…
Education

Mohanbuva Ramdasi also escaped the temptation of a bogus PhD

2 Mins read
Unmesh GujarathiSprouts Exclusive Samarth Ramdas Swami gave a message of spirituality and valor while chanting ‘Jai Jai Raghuveer Samarth’. This work of…