Site icon Sprouts News

लिंगपिसाट फादर पुन्हा मोकाट 

A conspiracy to privatise Ordnance factories

मिशनरी संस्थातील वासनांध हैवान मोकाटच!

पुण्यातील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांची नुसतीच टोलवाटोलवी; गुन्हा नोंदवून घ्यायलाही दहा महिने टाळाटाळ

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

‘पॉस्को’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करताना पोलिसांनी जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या व त्यामुळेच लिंगपिसाट फादरला पुणे जिल्हा सेशन न्यायालयाने जामीन दिल्याची दुर्दैवी घटना घडली,अशी धक्कादायक बाब ‘स्प्राऊट्स’च्या हाती आलेली आहे.

पुणे जिल्ह्यात हडपसर नावाचे गाव आहे. या गावातील १३ वर्षीय शालेय मुलावर फादर विन्सेंट परेरा हा अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायचा. विन्सेंट परेरा या फादरवर याआधीही लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेले आहेत. ही बाब पीडित मुलाच्या आईवडिलांना ठाऊक होती, त्यामुळेच ही बाब कळताच त्यांनी हडपसर पोलीस स्थानकात धाव घेतली.

मात्र ‘तेथेही हा गुन्हा आमच्या हद्दीत येत नाही’ असे कारण सांगून, पोलीस तक्रार घ्यायला टाळाटाळ करायला लागले. अखेर त्यांनी ४ पोलीस स्टेशन व १ पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली.

त्यानंतर तात्काळ पोलिसांनी आरोपी विन्सेन्ट परेरा (Vincent Pereira) याला बोलावून घेतला व त्याला तोंडी माफी मागायला लावले व प्रकरण मिटल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर खवळलेल्या आरोपी विन्सेंट परेरा याने पीडिताच्या आईवडिलांनाच धमकावल्याची बाब समोर आली आहे.

हा प्रकार येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते डॉमनिक लोबो व मारुती भापकर यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण पुन्हा हडपसर पोलिसांकडे नेले. तेथे न्याय मिळत नाही म्हणून ते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाही भेटले. तरीही गुन्हा नोंद करण्यात आलेला नव्हता. अखेरीस या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिल्ली येथील ‘राष्ट्रीय मानवी हक्क आयोगा’कडे
( एनएचआरसी ) तक्रार केली.

त्यानंतर अखेरीस म्हणजे तब्बल दहा महिन्यानंतर आयोगाने पोलिसांना नोटीस पाठवली व त्यानुसार हडपसर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला. व तेथून पुन्हा कोंढवा पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आलेला आला.

पोलिसांची भूमिका संशयास्पद
पोलिसांनी पॉक्सो कायद्यातील १६ व २१ हे कलम जाणीवपूर्वक लावले नाही. फक्त कलम ८च लावले. याच त्रुटीचा फायदा घेवून विकृत आरोपी लॉरेन्स पुणे सेशन न्यायालयातून जमीन घेण्यात यशस्वी झाला. मात्र लोबो व भापकर हे याविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेणार आहे, अशी माहिती त्यांनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना दिली.


Exit mobile version