Site icon Sprouts News

लिव्ह इन रिलेशनशिपचे बळी

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

सधन कुटुंबातील नवनवीन साध्याभोळ्या तरुणांना आकर्षित करायचे, त्यांच्याशी शारीरिक, मानसिक संबंध जोपासायचे. त्यांच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहायचे व वेळ पडल्यास त्यांनाच जीवे मारायचे किंवा आत्महत्येसाठी प्रवृत्त करायचे व त्यानंतर त्यांच्या संपत्तीवर डल्ला मारायचा, अशा विकृत तरुणीची त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कथित आत्महत्या केलेल्या तरुणाच्या भावाने केली आहे.

पिंटू अजित जाना, हा ३१ वर्षीय तरुण सुरंजना दत्त ( वय ३१ )या महिलेबरोबर २०१८ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. त्यावेळी सुरंजना यांनी मयत पिंटू यांना त्यांच्या वडिलोपार्जित मुंबईतील घर व दुकान विकायला भाग पाडले. या रकमेतील काही पैशातून त्यांनी खारघर येथे फ्लॅट विकत घेतला. त्यानंतर त्यांनी पद्धतशीरपणे पिंटूचे त्यांच्या आई व बहिणीशी असलेले नातेसंबंध तोडायला भाग पाडले व इतकेच नव्हे तर आईलाही घरातून हाकलून दिले.

यानंतर २४ मार्च २०२२ रोजी पिंटू यांची आई पुष्पा अजित जाना ( वय ६५ ) यांना त्यांच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे कळविण्यात आले. याआधी सुरंजना दत्त यांनी त्यांच्या कथित मित्रांच्या साहाय्याने पिंटू यांचा मृतदेह स्मशानात घाईघाईने अंत्यविधीसाठी नेलाही होता. मात्र त्याचवेळी पिंटू यांच्या आईने खारघर पोलिसांना फोन करून हस्तक्षेप केला व सांगितले की, पिंटू यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात यावे व आई या नात्याने अंतिम संस्कारासाठी त्यांना मृतदेह ताब्यात देण्यात यावा.

पिंटू यांच्या आईने पोस्टमार्टम करण्यापूर्वी स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रारही केली होती, मात्र त्या तक्रारीचा काहीही उपयोग झाला नाही.

या सर्व प्रकरणात संशयित महिला सुरंजना दत्त, तिचे साथीदार व खारघर पोलिसांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे, त्याची त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मयत पिंटू यांची आई पुष्पा जाना यांनी गृहमंत्री व पोलीस कमिशनर यांच्याकडे केली आहे.

सुरंजना या महिलेने पिंटू यांच्याशी विवाह केल्याचा दावा केला आहे. यापूर्वी सुरंजना यांनी यापूर्वी किती जणांशी विवाह केले होते. त्या सर्वांशी तिने रीतसर घटस्फोट घेतले का, घेतले असल्यास पिंटू यांच्याशी कायदेशीर विवाह केला होता काय. इतकेच नव्हे तर यापूर्वीही अशा पद्धतीने त्यांनी किती जणांना फसविले व त्यांची मालमत्ता हडप केली, याची त्वरित चौकशी करण्यात यावी, तसेच या प्रकरणाचा तपास निवृत्त न्यायाधीश किंवा भारतीय पोलीस सेवेतील प्रामाणिक सनदी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात यावा.

पिंटू यांची आत्महत्या नसून त्याचा खून करण्यात आला आहे, याप्रकरणी तक्रारपत्रातील संशियित आरोपी सुरंजना यांची त्वरित चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्व्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयत पिंटू याचे जवळचे नातेवाईक व भाऊ संकर मंडल यांनी केली आहे.


Exit mobile version