Education

GUJARAT: GATEWAY OF DRUGS

1 Mins read

z

Unmesh Gujarathi

Sprouts Analysis

There is a port named Okha in Gujarat, India. This port comes under Dwarka’s district, which is considered sacred as the land of gods. Dwarka during the time of Shri Krishna was famous for milk. At present, efforts are being made to smuggle drugs only through the Okha port of Dwarka. This is really frightening.

The Indian Coast Guard and Gujarat ATS performed a joint operation on Monday. The Pakistani boat was stopped, and the drugs worth 300 crores of rupees were seized. In this case, 10 Pakistani drug mafias were arrested. They were raided. During the raid, arms, ammunition, and about 40 kg of drugs were seized. It is the first time that arms have been seized at the sea border.

India’s Prime Minister, Narendra Modi, and Home Minister, Amit Shah, are both from Gujarat. In the past, many times, drugs were found in Gujarat only. Mundra Port is owned by Gautam Adani, who is considered close to Prime Minister Modi. This port seized 52 kg of cocaine on September 13, 2021. The price of this cocaine alone is more than 20 thousand crores of rupees. Thereafter, the investigation was handed over to the National Investigation Agency. After that, the government announced that there would be no transportation from Iran, Pakistan, or Afghanistan through this port, but in the meantime, 52 kg of cocaine worth Rs 500 crore was seized from the same port.

Speaking to the Sprouts, Pawan Khera, spokesperson for the AICC said, “Gujarat has become the gateway to drugs, No drug smuggling happens without state patronage. It is part of a big global syndicate. This should be thoroughly investigated.” 

Khera also asked, “How has Gujarat become the gateway of drugs to India even when our Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah are both from Gujarat?” And why are the other two silent?

गुजरातमधील ड्रग्ज तस्करीचे धनी कोण?

उन्मेष गुजराथी 

स्प्राऊट्स Exclusive 

भारतातील गुजरातमध्ये ओखा नावाचे बंदर आहे. हे बंदर देवभूमी म्हणून पवित्र मानल्या गेलेल्या द्वारका या जिल्ह्याच्या अंतर्गत येते. श्रीकृष्णाच्या काळी द्वारका ही दूधदह्यासाठी सुप्रसिद्ध होती. मात्र सध्या याच द्वारकेच्या ओखा बंदराच्या माध्यमातून ड्रग्जची तस्करी करण्यात प्रयत्न केला जातो, हे वास्तव भयावह आहे. 

सोमवारी भारतीय तटरक्षक दल व गुजरात एटीसने संयुक्त कारवाई केली. पाकिस्तानची बोट रोखली व तब्बल ३०० कोटींचे ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी १० पाकिस्तानी ड्रग्जमाफियांना अटक करण्यात आली. त्यांची झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान शस्त्रे, दारूगोळा आणि सुमारे ४० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. सागरी सीमेवर शस्त्रसाठा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे दोघेही गुजरातचे आहेत. त्यांच्या काळात गुजरातमध्ये  ड्रग्जचा साठा ठेवण्याचे प्रमाण  मोठ्या प्रमाणात वाढलेआहे. वास्तविक यापूर्वीही अनेक वेळेला गुजरातमध्ये ड्रग्ज सापडले गेले. पंतप्रधान मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गौतम अदानी यांच्या मालकीचे मुंद्रा बंदर आहे. या बंदरातून १३ सप्टेंबर २०२१ रोजी ५२ किलो कोकेन जप्त करण्यात आले. या कोकेनची किंमत ही २० हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आला. त्यानुसार या बंदरातून इराण, पाकिस्तान व अफगाणिस्तानमधून वाहतूक होणार नाही, अशी सरकारने घोषणाही केली होती, मात्र त्याच दरम्यान याच बंदरातून ५०० कोटी रुपयांचे ५२ किलो वजनाचे कोकेन जप्त करण्यात आले. 

 “गुजरात हे ड्रग्जचे प्रवेशद्वार बनले आहे. कोणत्याही ड्रग्जची तस्करी ही राजकीय संरक्षणाशिवाय होत नाही. हा मोठया जागतिक सिंडिकेटचा भाग आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी.” 

पवन खेरा, 

प्रवक्ता, काँग्रेस 


Related posts
Education

मोहनबुवा रामदासी यांनाही सुटला बोगस पीएचडीचा मोह

1 Mins read
उन्मेष गुजराथीस्प्राऊट्स Exclusive ‘जय जय रघुवीर समर्थचा गजर’ करीत समर्थ रामदास स्वामींनी अध्यात्म व बलोपासनेचा संदेश दिला. समर्थांच्या या कार्याचा प्रसार सध्या…
Education

Mohanbuva Ramdasi also escaped the temptation of a bogus PhD

2 Mins read
Unmesh GujarathiSprouts Exclusive Samarth Ramdas Swami gave a message of spirituality and valor while chanting ‘Jai Jai Raghuveer Samarth’. This work of…
Education

निष्क्रिय माजी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या शर्यतीत

1 Mins read
माजी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाची अवमान केल्याबद्दल नोटीस निवड समिती आणि प्रशासकीय अधिकारी आनंद मिलये यांच्याकडे तक्रार दाखल कुलगुरूपदासाठी थेट…