Exclusive

Son of a BJP MLA still absconding

2 Mins read

BJP MLA Ganpat Gaikwad Firing Case

Unmesh Gujarathi
Sprouts Exclusive

The BJP MLA who fired indiscriminately inside the police station and tried to kill a Shiv Sena office-bearer is currently in Taloja Jail. Even though two months have passed since the incident, the MLA’s son and the remaining 23 accused are still absconding.

BJP MLA Ganpat Gaikwad from Kalyan (Rural) in Maharashtra fired at the Shiv Sena city chief of Kalyan, Mahesh Gaikwad, inside the room of the senior police Inspector’s office. Ganpat Gaikwad is still in jail in Taloja for this case.

Apart from Ganpat Gaikwad, there are 27 other accused in this case, but only 5 of them have been arrested. The remaining 23 accused are still absconding. Ganpat Gaikwad’s son Vaibhav Gaikwad is also included in these accused.

Two months have passed since the incident, but the accused is still at large. Due to this, the lives of Mahesh Gaikwad, Rahul Patil, Prashant Bote land owner Neeta Jadhav, and many other eyewitnesses of the residents have been threatened.

Had the police not intervened in time, Mahesh Gaikwad and his associate Rahul Patil would have been killed. This incident happened in the police station itself, yet the police have not imposed section 353 (obstructing government work) yet.

Allegations of premeditated murder conspiracy
Mahesh Gaikwad and Rahul Patil had already alleged in a written complaint that the incident of firing at the police station was pre-planned. But still, the investigation is not being conducted properly and deliberately and that is why the accused is roaming freely, the residents have also alleged while talking to ‘Sprouts’ on the condition of anonymity.

The accused go scot-free
Harshad Kane, the prime accused in this case, fired 3 shots at Mahesh. Kane was a friend of the prime accused Vaibhav. So the police were bound to arrest Vaibhav immediately. But even after two months, Vaibhav and his other accomplices are still absconding. The police have not even issued a lookout notice against him, raising suspicions that there is political pressure on the police.

The bail application was also rejected
The Prime accused Vaibhav applied for bail in the Kalyan Court, but the court rejected it. He had also come to the court to make this application, but the police have made a ridiculous claim that he is yet to be found.

There is no ‘panchanama’ of cars either
In this alleged premeditated attack, the accused and his accomplices had brought weapons, and the vehicles in which they fled immediately after the firing were to be seized. But the police did not even do a simple ‘panchanama’ (documents recording the proceedings of searches and seizures) of these cars.

Political pressure on investigative bodies
The dispute between Ganpat Gaikwad and Mahesh Gaikwad is an old one. Even the police knew the animosity between them, but still no conscious precautions were taken by the police department, not only that, but many questions remain like how many people came to the police station with revolvers, leaving the accused and the victim, the police officers went out of the cabin at the same time.

The important question is how the 26 accused can abscond from the police station after the gruesome incident. All in all, this raises the suspicion of political pressure on the investigative system.

BJP’s image tarnished
Ganpat Gaikwad has a criminal background. Deepesh Mhatre of Yuva Sena and other BJP workers also demanded that he should be expelled from the party, taking into account that serious crimes have been registered against him in various police stations, so he is tarnishing the image of BJP at the local level.

दोन महिने उलटल्यावरही भाजपच्या आमदाराचा आरोपी मुलगा फरारच

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

पोलीस स्थानकातच अंधाधुंद फायरिंग करणाऱ्या व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला गोळ्या घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा भाजपचा आमदार सध्या तळोजा जेलमध्ये आहे. या घटनेला आज दोन महिने उलटून गेले, तरी आमदाराचा मुलगा व उर्वरित २३ आरोपी फरार असल्यामुळे आजही स्थानिक रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

महाराष्ट्रातील कल्याण (ग्रामीण ) येथील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्थानकातच गोळीबार केला. याप्रकरणी गायकवाड आजही तळोजा येथील तुरुंगात आहेत.

या प्रकरणात गणपत गायकवाड यांच्याव्यतिरिक्त आणखी २७ जण आरोपी आहेत, मात्र यातील फक्त ५ आरोपीनाच अटक करण्यात आलेली आहे. उर्वरित २३ आरोपी अद्यापही फरार आहेत. या आरोपींमध्ये गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याचाही समावेश आहे.

वास्तविक या घटनेला दोन महिने उलटून गेले, तरी आरोपी मोकाट आहे. त्यामुळे महेश गायकवाड, राहुल पाटील, प्रशांत बोटे यांच्यासह जमीन मालक नीता जाधव व इतर अनेक प्रत्यक्षदर्शी स्थानिक रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे.

पोलिसांनी वेळीस हस्तक्षेप केला नसता तर महेश गायवाड व त्यांचे सहकारी राहुल पाटील यांची हत्या झाली असती. वास्तविक ही घटना पोलीस स्थानकातच घडलेली आहे, तरीही पोलिसांनी ३५३ कलम (सरकारी कामात अडथळा ) अद्याप लावले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हत्येचा कट पूर्वनियोजित असल्याचा आरोप
पोलीस स्थानकात गोळीबार करण्याची घटना पूर्वनियोजित होती, असा आरोप महेश गायकवाड व राहुल पाटील यांनी यापूर्वीच लेखी तक्रारीत केला होता. मात्र तरीही तपास जाणीवपूर्वक योग्य पद्धतीने केला जात नाही व त्यामुळेच आरोपी राजरोसपणे मोकाट फिरत आहे, असा आरोपही स्थानिक रहिवाशांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘स्प्राऊट्स’शी बोलताना केला आहे.

आरोपी मोकाटच
या प्रकरणातील आरोपी हर्षद केणे याने महेश यांच्यावर ३ गोळ्या झाडल्या. केणे हा आरोपी वैभव याचा मित्र होता. त्यामुळे वैभवला तात्काळ अटक करणे पोलिसांना बंधनकारक होते. मात्र दोन महिन्यानंतरही वैभव व त्याचे इतर साथीदार अद्याप फरारच आहेत. पोलिसांनी त्याच्याविरोधात अद्याप लूक आउट नोटीसही काढण्यात आलेली नाही, यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा संशय निर्माण होवू लागला आहे.

जामीन अर्जही फेटाळला
आरोपी वैभव याने जामीन मिळवण्यासाठी कल्याण न्यायालयात अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. हा अर्ज करण्यासाठी तो न्यायालयातही आलेला होता, मात्र तो अद्याप सापडत नसल्याचा हास्यास्पद दावा पोलिसांनी केला आहे.

गाड्यांचा पंचनामाही नाही
या कथित पूर्वनियोजित हल्यात आरोपी व त्याचे साथीदार यांनी शस्त्रे आणलेली होती व गोळीबार केल्यानंतर ज्या वाहनांनी ते त्वरित पळून गेले, त्या गाड्या जप्त करायला हव्या होत्या. मात्र पोलिसांनी या गाड्यांचा साधा पंचनामाही केला नाही.

तपास यंत्रणेवर राजकीय दबाव
गणपत गायकवाड व महेश गायकवाड यांच्यामधील वाद हा जुनाच आहे. त्यांच्यातील वैमनस्य पोलिसांनाही माहित होते, मात्र तरीही पोलीस खात्याकडून जाणीवपूर्वक खबरदारी घेण्यात आलेली नव्हती, इतकेच नव्हे तर अनेक जण रिव्हॉलव्हर्स घेऊन पोलीस स्थानकात कसे आले,आरोपी व पीडित याना सोडून ऐनवेळी पोलीस अधिकारी केबिनबाहेर गेले कसे, असे असंख्य प्रश्न उपस्थित रहातात.

विशेष म्हणजे दुर्घटना घडल्यानंतर २६ आरोपी पोलीस स्थानकातून फरार कसे होवू शकतात, हा महत्वाचा प्रश्न आहे. एकंदरीतच यामुळे तपास यंत्रणेवर राजकीय दबाव असल्याचा संशय निर्माण होवू लागलेला आहे.

भाजपची प्रतिमा डागाळली
गणपत गायकवाड यांची बॅकग्राऊंड गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्यांच्यावर यापूर्वीही विविध पोलीस स्थानकात गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे भाजपची स्थानिक पातळीवर प्रतिमा डागाळत आहे, याची दखल घेऊन त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही युवा सेनेचे दीपेश म्हात्रे व इतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली होती.

Related posts
Exclusive

Wilson College Students in Mumbai Prohibited from Sitting for Exams

1 Mins read
मुंबईत ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’
Exclusive

पुण्यातील आगामी 'अजय-अतुल लाईव्ह' कॉन्सर्ट स्थगित 

1 Mins read
मुंबईत ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’
Exclusive

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

1 Mins read
मुंबईत ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’