Site icon Sprouts News

घोटाळेबाज प्रवीण दरेकरांवर कारवाई करण्यास मुंबई पोलिसांवर दबाव आहे काय?

मुंबई बँक ही मुंबईकरांच्या कष्टातून उभी राहिलेली आहे

स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी :

उन्मेष गुजराथी

बँकेत आजही सर्वसामान्य मुंबईकरांच्याच ठेवी आहेत. या बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. मात्र या कोट्यवधी रुपयांच्या या भ्रष्टाचारात भारतीय जनता पक्षासह महाविकास आघाडीचे नेतेही सामील आहेत,

त्यामुळेच यामधील मुख्य आरोपी भाजपचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास मुंबई पोलीस घाबरत आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचे सचिव धनंजय शिंदे यांनी केला आहे.

सहकार विभागाचे विशेष लेखापरीक्षक निलेश नाईक यांनी २०१४ – १५ ते २०१९ – २० या पाच आर्थिक वर्षांच्या कालावधीचे वैधानिक चाचणी लेख परीक्षण केले. त्याचा अहवालही सादर केला. या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की याकाळात २ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.

या अहवालातील या धक्कादायक माहितीनुसार नाईक यांनी फोर्ट येथील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही दिली आहे. या घटनेला तब्ब्ल १ महिना उलटून गेला आहे.

नाईक यांच्यासह धनंजय शिंदे यांनीही तशी फिर्याद दाखल केली आहे. मात्र पोलिसांनी चौकशी तर सोडा साधा गुन्हा देखील दाखल केला नाही. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्रही दिले आहे.

पोलीस आयुक्त संजय पांडे यांची पाच ते सहा वेळेला प्रत्यक्ष भेटही घेतली आहे. मात्र अदयाप कोणतीही कारवाई झालेली नाही.

आमदार प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील, उन्मेष पाटील, सुधीर मुनगंटीवार, बच्चू कडू, रावसाहेब दानवे, दिलीप वळसे – पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईक व संबंधित कंपन्यांना मुंबई बँकेने कोट्यवधी रुपयांची कर्ज दिलेली आहेत,

ही कर्ज देताना नियम धाब्यावर बसवून दिल्याचा संशय आहे, याचीही त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अधिवक्ता दिलीप इनकर यांनी केली आहे.

“शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणे, मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणणे, आदी कथित गुन्हे करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी त्वरित कारवाई केली. मात्र सर्वसामान्य मुंबईकरांच्या ठेवींवर डल्ला मारणारे प्रवीण दरेकर मोकाट कसे?”
धनंजय शिंदे, (सचिव, आप, महाराष्ट्र राज्य)
Exit mobile version