Education

Beer bar on the land which is rewarded to Khandoba Temple

2 Mins read

Unmesh Gujarati
Sprouts Exclusive

Chhatrapati Shahu Maharaj had gifted land to the temple of lord Khandoba at Jejuri. The Special Investigation Team (SIT) of ‘Sprouts’ has got the sensational information that the caretakers of the temple have opened a beer bar on this said land gifted to Khandoba temple.

There is a temple of the lord Khandoba in the village of Jejuri in Pune district, who is the deity of Maharashtra. So far, more than 250 acres of land have been donated to the temple for spiritual purpose and to generate income for the maintenance of this temple.

Chhatrapati Shahu Maharaj ( son of Chhatrapati Sambhaji and Maharani Yesubai, Satara dynasty ) himself donated some land to the temple in order to generate income for the distribution of daily food (prasad) and worship. It was Maharaj’s noble intention that this expenditure should be met from the income of this land.


On this land, Chhatrapati Shahu Maharaj built a holy tank called ‘Malhartirtha’ for the devotees who come to visit. Next to this tank (kind), there is also a tank called ‘Lakshmithirtha’. Bathing in this historic tank is considered very sacred.

Peshwas were looking after the maintenance of such holy land. Even today his alleged descendant Mhalsakant Peshwa is living in Jejuri village. But due to greediness and desire of excessive money, he has built a beer bar on this land. So pictures of drunkards pouring liquor can be seen here every day.

Due to this beer bar on the premises of the temple, there is a constant flow of drunkards throughout the day, thereby the sanctity of the temple and the holy tank is being destroyed. The temple is being desecrated. Besides, this is a misuse of the land gifted by Chhatrapati to the temple. Therefore, the liquor license of this beer bar should be terminated immediately and action should be taken against the guilty persons. Such demand has been made by former Trustee of ‘Martand Devsansthan Trust’ Nanda Raut and social activist Surendra Kadam while speaking to the ‘Sprouts’.

Here’s the legend :


Even today there is a historical holy tank on the land rewarded by Maharajas. The water in this tank is considered sacred. The Peshwas took the water from this tank to the fields. The grains produced from it were used for prasad to be distributed to the devotees. There is a legend that Lakshmi reaches the house of devotees as this grain goes from house to house. Today, a beer bar has been opened adjacent to this holy tank.

Are there Peshwas?

The SIT of the Sprouts has doubts about whether today those who claim to be descendants of Peshwa are really his descendants. When Mhalsakant Peshwa was contacted for a reaction, he could not be reached.

छत्रपतींनी ‘खंडोबा’च्या मंदिराला इनाम दिलेल्या जागेवर बिअर बार

उन्मेष गुजराथी

स्प्राऊट्स Exclusive

छत्रपती शाहू महाराज यांनी जेजुरी येथील ‘खंडोबा’ देवाच्या मंदिराला इनाम म्हणून जागा दिलेली होती. या पवित्र जागेवर मंदिराच्या देखभाल करणाऱ्यांनी चक्क ‘बिअर बार’ उघडलेला आहे, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जेजुरी या गावात खंडोबा देवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या देखभालीसाठी उत्पन्न मिळावे म्हणून आतापर्यंत देवस्थानाला २५० हून अधिक एकर जमिनी दानस्वरूपात मिळालेल्या आहेत.

रोजमारा (प्रसादरुपी धान्य ) वाटप व पूजाअर्चा करण्यासाठी उत्पन्न मिळावे, यासाठी दस्तरखुद्द छत्रपती शाहू महाराज यांनी मंदिराला काही जमीन दान केली. ही जागा अध्यात्मिक हेतूने दिली होती. या जागेच्या उत्पन्नातून प्रसाद व देवस्थानच्या देखभालीचा खर्च भागविण्यात यावा, हा महाराजांचा उदात्त हेतू होता.

याच जमिनीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी ( son of Chhatrapati Sambhaji and maharani Yesubai, Satara,dynasty ) दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी ‘मल्हारतीर्थ’ या नावाने पवित्र कुंड उभारले. या कुंडाशेजारी ‘लक्ष्मीतीर्थ’ नावाचे कुंड देखील आहे. या ऐतिहासिक कुंडात स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते.

अशा या पवित्र जमिनीची देखभाल पूर्वीपासून पेशवे पाहत होते. आजही त्यांचे कथित वंशज म्हाळसाकांत पेशवे जेजुरी गावात राहत आहेत. मात्र पैशाच्या अतिहव्यासामुळे त्यांनी या जागेवर चक्क ‘बिअर बार’ टाकलेला आहे. त्यामुळे दररोज येथे मद्यपी दारु ढोसत असल्याचे चित्र बघायला मिळते. 

देवस्थानच्या जागेवरील या बिअर बारमुळे दिवसभर येथे तळीरामांची वर्दळ असते, त्यामुळे देवस्थान व पवित्र कुंडाचे पावित्र्य नष्ट होत आहे. देवस्थानाची विटंबना होत आहे. याशिवाय देवस्थानाला छत्रपतींनी दिलेल्या जागेचा हा गैरवापर आहे. त्यामुळे हा बिअर बार त्वरित बंद करण्यात यावा, व दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री. मार्तंड देवसंस्थान ट्रस्टच्या माजी विश्वस्त नंदा राऊत व सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र कदम यांनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना केलेली आहे.

अशी आहे आख्यायिका:

महाराजांनी दिलेल्या जागेवर आजही ऐतिहासिक पवित्र कुंड आहे. या कुंडातील पाणी पवित्र मानले जाते. या कुंडातील पाणी घेवून ते पेशव्यांनी शेतात टाकावे. त्यातून उत्पन्न होणारे धान्य हे भाविकांना ‘रोजमारा’ (प्रसादरुपी धान्य ) म्हणून वाटावे. हे धान्य घरोघरी गेल्यामुळे भाविकांच्या घरी लक्ष्मी नांदते, अशी आख्यायिका आहे, आज याच पवित्र कुंडाशेजारी हा बिअर बार उघडण्यात आलेला आहे.

पेशवे असली आहेत काय?

आजमितीला पेशवे यांचे वंशज म्हणवणारे त्यांचे खरोखरीच वंशज आहेत काय, याविषयी ‘स्प्राऊट्स’च्या टीमला शंका आहे. याबाबत म्हाळसाकांत पेशवे यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता, तो होवू शकला नाही. 


Related posts
Education

मोहनबुवा रामदासी यांनाही सुटला बोगस पीएचडीचा मोह

1 Mins read
उन्मेष गुजराथीस्प्राऊट्स Exclusive ‘जय जय रघुवीर समर्थचा गजर’ करीत समर्थ रामदास स्वामींनी अध्यात्म व बलोपासनेचा संदेश दिला. समर्थांच्या या कार्याचा प्रसार सध्या…
Education

Mohanbuva Ramdasi also escaped the temptation of a bogus PhD

2 Mins read
Unmesh GujarathiSprouts Exclusive Samarth Ramdas Swami gave a message of spirituality and valor while chanting ‘Jai Jai Raghuveer Samarth’. This work of…
Education

निष्क्रिय माजी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या शर्यतीत

1 Mins read
माजी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाची अवमान केल्याबद्दल नोटीस निवड समिती आणि प्रशासकीय अधिकारी आनंद मिलये यांच्याकडे तक्रार दाखल कुलगुरूपदासाठी थेट…